वैवाहिक जीवनात जेव्हा घटस्फोटाची वेळ येते खरंतर दोघांचं खरं रूप समोर येतं. जे आधी 'आपलं' होतं ते नंतर 'तुझं' आणि 'माझं' होऊ लागतं. अनेक महागड्या घटस्फोटांची नेहमीच आपण चर्चा ऐकत असतो. अॅमेझॉनच्या मालकाचा आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. कारण त्याला पोटगी म्हणून कितीतरी कोटी रूपये पत्नीला द्यावे लागले होते. पण कॅनडातील एका व्यक्तीने घटस्फोटानंतर पत्नीला पैसे द्यावे लागू नये म्हणून जे केलं ते वाचून डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही.
इथे एका उद्योगपतीने पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला मुलांसाठी पत्नीला पैसे द्यावे लागणार होते. त्याने हे टाळण्यासाठी १ मिलियन डॉलरला आग लावली. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ५ कोटी रूपये इतकी होते.
Bruce McConville असं या उद्योगपतीचं नाव असून त्याने कोर्टात सांगितले की, त्याने त्याच्या सर्वच बॅंक अकाऊंट्समधून पैसे काढले आणि त्यांना आग लावली. त्याने सांगितले की, त्याचे पाच बॅंक अकाऊंट होते. ज्यांमधून १ मिलियन डॉलर काढले आणि आग लावली गेली.
या कारनाम्यासाठी कोर्टाने उद्योगपतीला ३० दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लोकांना ब्रूसच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा त्याने बॅंकेतून पैसे काढल्याच्या सर्व पावत्याही दाखवल्या. त्याने सांगितले की, त्याने हे पैसे त्याची प्रॉपर्टी विकून जमा केले होते.
ब्रूसने केलेल्या या घटनेला कोर्टाने केवळ व्यक्तिगतच नाही तर सार्वजनिक दृष्टीनेही बेजबाबदारीचं मानलं आहे. त्यानुसार त्याला ३० दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून सोबतच २ हजार कॅनेडियन डॉलरचा दंडही ठोठावला आहे.