पत्नीनं (Wife) दरमहा बचत (Monthly savings) करून साठवलेल्या पैशांतून (money) तिच्या पतीनं (Husband) महागडा व्हिडिओ गेम (costly video game) खरेदी केला. हे पाहून त्याची पत्नी इतकी रागावली की तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. वास्तविक, अनेक घरांत बायका पैशांची बचत करताना तर पुरुष पैसे उधळताना दिसतात. त्यावरून अनेकदा कुटुंबात वादावादी होण्याचे प्रसंगही येत असतात. किती पैसे खर्च करायचे आणि किती सेव्ह करायचे, याची प्रत्येक कुटुंबाची आपापली गणितं असतात. मात्र प्रत्येक व्यवहार हा जोपर्यंत पारदर्शक असेल, तोपर्यंत नाती घटट् राहतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पत्नीनं सेव्हिंग केलेल्या पैशांतून पतीनं व्हिडिओ गेम घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर पत्नीनं जे काही केलं, त्यामुळे पतीलाही जोरदार धक्का बसला.
सोशल मीडिया साईट रेडिट.कॉमवर एका ३५ वर्षांच्या महिलेनं तिच्या ३७ वर्षांच्या पतीसोबतचा एक संतापजनक अनुभव शेअर केला आहे. पत्नीनं गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवून ठेवले होते. आयत्या वेळी कुठल्याही खर्चासाठी असावेत, म्हणून हे पैसे तिने बाजूला ठेवले होते. मात्र पतीनं हे पैसे घेतले आणि ते खर्च करून त्याने महागडी व्हिडिओ गेम घेतली. पतीनं तब्बल ६० हजार रुपयांची व्हिडिओ गेम खरेदी केली आणि घरी आणली.
असा काढला रागआपल्या पतीनं आपल्याला न सांगता पैसे खर्च करून व्हिडिओ गेम आणल्याबद्दल त्याला धडा शिकवण्याचा निर्णय पत्नीनं घेतला. ज्यावेळी तिचा भाचा घरी आला, त्यावेळी तीच व्हिडिओ गेम गिफ्ट पेपरमध्ये पॅक करून तिने आपल्या भाच्याला गिफ्ट केली. हे पाहून पतीला काहीच बोलता आलं नाही, मात्र त्याचा भयंकर संताप झाला. सध्या त्याने आपल्याशी अबोला धरल्याचं पत्नीनं म्हटलं आहे.
बरा धडा शिकवलापत्नीनं पतीला बरा धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया युजर्सनी दिली आहे. तर ही एक प्रकारची चोरीच आहे, असं सांगत नेटिझन्सची पतीवर टीका केली आहे.