कार जोरात चालवली म्हणून दंड, लायसन्स नसेल तर दंड किंवा रस्त्यावर थुंकल्यावर दंड भरावा लागत असल्याचं तुम्ही वाचलं असेल. पण एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी पादण्याचा दंड भरावा लागला आहे. ऑस्ट्रियातून एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल आणि पोट धरून हसालही. एका व्यक्तीला ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. कारण त्याने पोलिसांसमोर गॅस सोडण्याचा म्हणजेच पादण्याचा गुन्हा केला.
असे सांगितले जात आहे की, ही व्यक्ती व्हिएना शहरातील एका पार्कमध्ये आपल्या मित्रांसोबत बसली होती. त्यादरम्यान पोलीस अधिकारी रूटीन चेकिंगसाठी तिथे पोहोचले. या दोन व्यक्तींसोबत ते बालू लागले. दरम्यान एका व्यक्तीने गॅस सोडला. (हे पण वाचा : बोंबला! तुरूंगातील कैद्याच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे तिलाच मिळाली शिक्षा....)
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना बघून हा आरोपी माणूस पार्कमधील बेंचवर उभा राहिला आणि त्याने मुद्दामहून पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठ करत जोरात गॅस सोडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला सार्वजनिक अभद्रतेचा गुन्हा दाखल करत त्याला दंड ठोठावला. (हे पण वाचा : बापरे बाप इतकं खोटं! सुट्टीसाठी त्यांने सांगितलं चारवेळा लग्न अन् तीन वेळा घटस्फोटाचं कारण....)
यानंतर या व्यक्तीने दंड चुकीचा ठरवत ऑस्ट्रियाच्या एका कोर्टात पोलिसांविरोधात केस दाखल केली आहे. यात त्याने तर्क दिला की, पेट फुगणं आणि गॅस काढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि भलेही हे कृत्य मुद्दामहून केलं गेलं असेल पण अभिव्यक्ती स्वांतत्र्यांसाठी याला मूलभूत अधिकाराच्या रूपात स्वीकारलं पाहिजे.
जून २०२० मध्ये घडलेल्या या घटनेची सुनावणी अनेक महिने सुरू होती आणि अखेर कोर्टाने या केसचा निकाल नुकताच लावला. कोर्टाने आरोपी व्यक्तीला दिसाला देत त्याच्या दंडाची रक्कम कमी केली आहे. त्याला आता कोर्टाच्या आदेशानुसार, ४५ हजार रूपयांऐवजी केवळ ९ हजार रूपये दंड भरावा लागेल.
हा निर्णय कोर्टाने व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि आधीच्या रेकॉर्डवर विचार केल्यावर दिला. आपल्या निर्णयावेळी कोर्टाने असंही सांगितलं की, गॅस सोडणं समाजात स्वीकारलं जातं. पण तरी हा प्रकार अभिव्यक्तीच्या रूपात शालीनतेची सीमा पार करतो.