बऱ्याचदा महिला खूप खर्च करतात किंवा शॉपिंग करतात असा सूर ऐकायला मिळतो. अनेकदा पतीही पत्नीची यावरून गंमत करताना दिसतात. अशात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं क्रेडिट कार्ड चोरी गेल्याचा एक किस्सा सांगितलं. फ्रॅमवेलगेटच्या 81 वर्षीय लॉर्ड मॅकेंजी यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये असं काही सांगितलं जे ऐकून सगळेच अवाक् झाले.
डरहम कांस्टेबुलरीचे माजी मुख्य अधीक्षक आणि बराच काळ पोलीस अधीक्षक असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले लॉर्ड मॅकेंजी यांनी इलेक्ट्रॉनिक मशीन्सच्या एका डिबेटमध्ये सांगितलं की, माझ्या पत्नीच्या लंडन टूर दरम्यान तिचं क्रेडिट कार्ड चोरी झालं होतं.
त्यांनी सांगितलं की, मी या चोरीबाबत काहीच केलं नाही आणि सगळ्यात आधी यावर नजर टाकली की, चोर कार्डसोबत काय करतो. त्याचा वापर कसा करतो. कार्डचा वापर पाहिल्यावर मी पोलिसात कोणतीही एफआयआर दाखल केली नाही. कारण चांगली बाब ही आहे की, चोर माझ्या पत्नीपेक्षा कमीच खर्च करत होता.
मॅकेंजी यांचं बोलणं ऐकून हॉलमधील सगळेच खळखळून हसू लागले होते. तेव्हा त्यांचे साथीदार लॉर्ड्स यांना जाणीव झाली की, हे सीरीअस आहे. नंतर नॉर्बिटनचे ट्रेजरी मंत्री बॅरोनेस वेरे यांनी उत्तर दिलं की, मला वाटतं की, या स्थितीत कुणीही नेहमी एफआयआर दाखल करावी.
जन्मापासूनच अंध माजी लेबर गृह सचिव लॉर्ड ब्लंकेट दिव्यांग किंवा दृष्टी नसलेल्या लोकांसाठी पेमेंट डिवाइसेसची पोहोच यावर डिबेट आयोजित केली होती. तिथे मॅकेंजी यांनी हा किस्सा सांगितला होता. ब्लंकेट यांच्यानुसार, त्यांना सगळ्यात जास्त समस्या तेव्हा होते जेव्हा ते फ्लॅट स्क्रीन डिवाइसवर आपला पिन टाकतात.
या स्थितीत ते अनेकदा कोडचा अॅक्सेस गमावून बसतात. ते असंही म्हणाले की, हे अशा लोकांसाठी एक मोठं आव्हान आहे जे दृष्टीहीन आहेत.