साधारणपणे लोक आपल्या पार्टनरसोबत डेटवर जातात किंवा नवीन पार्टनर पाहण्यासाठी डेटवर जातात. यासाठी अनेक जण रेस्टॉरंट, पार्क किंवा क्लब अशी ठिकाणे निवडतात. याठिकाणी खाणे, पिणे आणि फिरण्याच्या बहाण्याने जोडपी एकमेकांना ओळखतात, जेणेकरून नाते पुढे टिकले जाईल. परंतू, ज्यावेळी एक तरुण पहिल्यांदाच एका तरुणीला भेटण्यासाठी डेटवर गेला, त्यावेळी असं काहीसं घडलं की, तरुणाने डेटचे ठिकाण सोडल्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठले.
मॉस्कोमधील या अनोळखी 28 वर्षीय तरुणाने एका तरुणीवर आरोप केला की, ते दोघेही पहिल्यांदा डेटवर भेटले. यावेळी दोघांनीही काही गप्पा रंगल्या आणि जेवण केले. मात्र, यादरम्यान जेवणाचे बिल $165 (13,700 रुपये) आले. अशा परिस्थितीत जेव्हा बिल भरण्याची वेळ आली, तेव्हा तरुणाने डेटवर आलेल्या तरुणीला बिलाचे अर्धे पैसे भरण्यास सांगितले, परंतु ती यामुळे संतप्त झाली आणि संपूर्ण बिल तरुणाला भरायला सांगून पळून गेली.
संबंधित तरुणाने पोलिसांना सांगितले की, काही आठवड्यांपूर्वी त्याची एका तरुणीसोबत ऑनलाइन ओळख झाली होती. सोशल मीडियाद्वारे एकमेकांना ओळखल्यानंतर त्यांनी एकत्र डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरुणाने मॉस्कोमधील मीरा एव्हेन्यूवर एक कॅफे निवडला. याठिकाणी दोघांनी गप्पा मारल्या आणि जेवण केले. वेटर बिल घेऊन येईपर्यंत सगळं व्यवस्थित सुरु होते. पण, बिल पाहिल्यानंतर त्या तरुणीला बिल अर्धे भरण्यास सांगितले.
यावेळी "तुम्ही जास्त ऑर्डर दिली आहे, मग मी बिल का भरू", असे म्हणत तरुणीने स्पष्ट नकार दिला. बिलावरून काही मिनिटे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संपूर्ण बिल तरुणावर सोडून तरुणी कॅफेमधून बाहेर पडली. दरम्यान, तरुणाच्या तक्रारीनंतर पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.