मजा-मस्तीमध्ये अनेकदा गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीला मेल्यासारखं झोपल्याचं म्हटलं जातं. तर कधी कधी मृत व्यक्ती देखील जिवंत झाल्याच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. स्पेनच्या तुरुंगातील एका कैद्यासोबत असंच काहीसं झालं. 29 वर्षीय एक कैदी गॉन्ज़ैलो मोंटोया जिमेनेज़ (Gonzalo Montoya Jimenez) याला तुरुंगात असताना मृत घोषित करण्यात आलं होतं. पण तो पोस्टमार्टमपूर्वीच उठून उभा राहिला आहे.
Daily Star च्या रिपोर्टनुसार, 2018 मध्ये लूट प्रकरणात तुरुंगात असलेला गॉन्ज़ैलो मोंटोया जिमेनेज़ हा तेथे संशयास्पद अवस्थेत आढळला. यानंतर 3 वेगवेगळ्या डॉक्टरांनी त्याला तपासलं. त्याला शवगृहात नेण्याआधी मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्याला बॅगेत भरून ऑटोप्सीसाठी पाठण्यात आलं. जेव्हा गॉन्ज़ैलोला बॅगेत ठेवलं तेव्हा आतून काहीतरी आवाज येऊ लागला. थोड्या वेळानंतर घोरण्याचा आवाज वाढला.
काही वेळापूर्वीच तुरुंगातील एका डॉक्टरने त्याला तपासलं होतं आणि तो मृत असल्याचं सांगितलं होतं. त्याला मृत घोषित केल्यानंतर काही तासांनी फॉरेन्सिक डॉक्टरांनी देखील हेच सांगितलं. तिसऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरात काही विचित्र बाबी आढळल्या, ज्यानंतर शरीरावर खुणा करून तपासासाठी ऑटोप्सीसाठी पाठवण्यात आलं. कैदी जसा ऑटोप्सी करण्यासाठी गेला, तो अचानक उठून चालू लागला. काही स्थानिक रिपोट्स नुसार, फॉरेंन्सिक पॅथलॉजिस्टने जेव्हा बॉडी बॅग उघडली तर कैदी जिवंत होता. यानंतर तातडीने त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं.
खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं. स्पॅनिश जेल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कैद्याला 3 डॉक्टरांनी तपासलं होतं आणि तिघांनीही मृत्यूची पुष्टी केली. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने एका दिवसांपूर्वी आजारी असल्याची तक्रार केली होती आणि त्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. व्यक्ती कसा वाचला याबाबत तर काही कळालं नाही, मात्र त्याने उठल्यानंतर आपल्या पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.