शरीरसंबंध ठेवताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आफ्रिका खंडातील मालावी देशात घडली आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना हा प्रकार घडला. शारीरिक संबंधांवेळी परमोच्च आनंद मिळाल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली.पोलिसांनी नोंद केलेल्या माहितीनुसार चार्ल्स मजावा असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय ३५ वर्षे होतं. देहविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना चार्ल्स मजावा बेशुद्ध पडले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, देहविक्रय करणाऱ्या या घटनेची माहिती तिच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना दिली. त्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगण्यात आला.
शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीचा मृत्यू; परमोच्च आनंद मिळणं ठरलं जीवघेणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 11:18 IST