आपण अनेक सिनेमांमध्ये असं पाहिलं की, काही कारणांसाठी एखाद्या व्यक्तीची कबर पुन्हा खोदली जाते. पण तुम्हाला वाटत असेल की, हे केवळ सिनेमातच होतं तर तुम्ही चुकताय. Mozambique आफ्रिकेच्या दक्षिण भागातील एक देश आहे. आणि इथे अशीच एक विचित्र घटना घडली आहे. पोलिसांनी एका तरूणाला कबर खोदताना अटक केली आहे. हा तरूण त्याच्या आई-वडिलांची कबर खोदत होता.
हा तरूण Nampula चा राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण त्याच्या आई-वडिलांची कबर त्यांच्या हाडांची तस्करी करण्यासाठी खोदत होता. इतकेच नाही तर या तरूणीने पोलिसांना सांगितले की, त्याला या कामाच्या मोबदल्यात बाईक मिळणार होती. त्याला त्याच्या बॉसने सांगितले होते की, अशा लोकांची हाडे हवीत, जे एखाद्या आजाराने मृत झालेले नाहीत.
आपल्या आई-वडिलांसोबतच हा तरूण त्याच्या काकाची कबर देखील खोदत होता. त्याने सांगितले की, त्याचा त्याला म्हणाला की, बाईकसोबतच ३०० डॉलर कॅशही दिली जाईल. पोलिसांनुसार, अशाप्रकारच्या घटना या भागात वाढत आहेत. २०१९ मध्ये आतापर्यंत अशाप्रकारच्या पाच घटना समोर आल्या आहेत. जगभरात मानवी हाडांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. काही देशांमध्ये तर यासाठी कठोर शिक्षेचा कायदाही आहे.