वर्ष २००९, तेव्हा या व्यक्तीचं वय २६ वर्षे होते. अचानक त्याची नोकरीही गेली. पण कोणत्याही गोष्टीमुळे न खचता आयुष्यात आलेले अनेक चढ उतार पाहत त्या व्यक्तीनं लांबचा पल्ला गाठला. आता ही व्यक्ती आठवड्यातून फक्त ५ तास काम करते आणि त्याची दरमहा कमाई १ कोटी २० लाखांहून अधिक आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे त्याचं पॅसिव्ह इनकम आहे. म्हणजे काम असो वा नसो त्याला तितकं उत्पन्न मिळतंच.
ग्रॅहम कोचरेन असं या व्यक्तीचं नाव असून तो द रेकॉर्डिंग रिव्होल्युशनचा संस्थापक आहे. लहानपणापासूनत त्याच्या मनात संगीताविषयी आवड होती. त्यानं कॉर्पोरेच जगतातही ऑडिओ इंजिनिअर म्हणून ९ ते ५ हा जॉब केला. २००९ मध्ये त्याची नोकरी गेली. तसंच यानंतर त्यानं फुल टाईम प्रोडक्शन बिझनेस सुरू केला. CNBC च्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली. त्यांचा जेव्हा जॉब केला तेव्हा ग्रॅहम आणि त्यांची पत्नी आई वडिल झाले होते. दोघंही फ्रिलान्स करत होते. अशातच त्यांनी आर्थिक संकटाचाही सामना केला.
सुरू केला म्युझिक ब्लॉगयानंतर ग्रॅहमने संगीत ब्लॉग सुरू केला. त्याचं नाव होतं The Recording Revolution. अधिकाधिक पैसे कमवायचे हाच म्युझिक ब्लॉग सुरू करण्यामागे एकमेव उद्देश होता. व्यवसाय फायदेशीर कसा बनवायचा हे शिकण्यासाठी ग्रॅहमला काही वर्षे लागली. २०२२ मध्ये ऑनलाइन बिझनेसमधून सर्वाधिक कमाई झाली होती. The Recording Revolution मधूनच एका महिन्यात ३० लाखांपेक्षा अधिक कमाई झाली. तर ऑनलाइन कोचिंग बिझनेसमधून ९० लाखांची कमाई झाली. आठवड्यात आपण केवळ पाचच तास काम करतो आणि उर्वरित वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालवतो असंही त्यानं सांगितलं.
कशी होते १ कोटींची कमाई"आपण युट्यूब आणि ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या कामाची सुरूवात केली. यामाध्यमातून आपल्याला असलेली समज लोकांपर्यंत पोहोचवली," असंही त्यानं सांगितलं. सुरूवातील १५ ते ७५ हजारांपर्यंत कमाई होत होती. २०१० मध्ये पहिल्यांदा ऑनलाइन कोर्सची विक्री केली. त्यासोबत ई बुकदेखील मोफत दिलं जात होतं. त्यावेळी त्याचे ५०० सबस्क्रियबर्स होते. सध्या त्यानं अनेक ऑनलाइन कोर्स विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. एकाची किंमत ५ ते ३० हजारांमध्ये आहे. ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान ७६ लाखांची विक्री झाली.
त्यानंतर The Recording Revolution ची ३० लाखांची कमाई झाली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यानं आपल्या दुसऱ्या व्यवसायाचीही सुरूवात केली. यामध्ये त्यानं शिकवण्याचं काम सुरू केलं. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्याची कमाई ९१ लाखांपेक्षा अधिक आहे. सध्या २८०० पेक्षा अधिक कोचिंग बिझनेस करणारे त्यांच्या प्रोडक्टचा वापर करत आहेत.