बदलत्या काळासोबत वेगवेगळे करिअर स्कोपही बदलत आहेत. मात्र, नोकरी करणाऱ्या काही लोकांची नेहमीच ही तक्रार असते की, ते जे काम करतात त्यावर त्यांचं प्रेम नाही. पण एका व्यक्तीला अशा कामाचे पैसे मिळतात, जे काम अनेकजण टाइमपाससाठी करतात. या व्यक्तीच कमाई लाखांमध्ये आणि यासाठी त्याचा काही वेळही फिक्स नाही.
२५ वय अन् १.८२ लाखांची महिन्याला कमाई
(Image Credit : lifewire.com)
डीन फोर्डचं वय २५ वर्षे आहे. स्कॉटलॅंडचा राहणारा डीनला व्हिडीओ गेम खेळणं पसंत आहे. त्याने याच क्षेत्रात त्याचं करिअर घडवलंय. तो लोकांना ऑनलाइन 'फोर्टनाइट' व्हिडीओ गेम खेळणं शिकवतो. त्यासाठी त्याला महिन्याला १.८२ लाख रूपये मिळतात. तो कोणत्या कंपनीत नाही. त्यामुळे तो हे काम स्वतंत्र्यपणे करतो.
गेमिंगच्या जगातील Lostbean आहे नाव
रिपोर्ट्सनुसार, गेमिंगच्या जगात लोक डीन फोर्डला लॉस्टबीन नावाने ओळखतात. तसा तो यूजर्सना सर्वच प्रकारचे व्हिडीओ गेम शिकवतो. पण त्याच्या कमाईचा मोठा भाग हा फोर्टनाइटमधून मिळतो. डीन सांगतो की, 'मला हे म्हणायचं आहे की, हा ड्रीम जॉब आहे. मी माझ्या हिशोबाने काम करतो. मी दुसऱ्यासाठी काम करत नाही'.
दररोज सहा तास खेळतो गेम
डीन सांगतो की, तो दररोज ६ तास व्हिडीओ गेम खेळतो. जे यूजर्स त्याच्याकडून गेम खेळणं शिकतात त्यात ८ वर्षापासून ते ५० वर्षांपर्यंतचे लोक आहेत. डीन असंही सांगतो की, आज फोर्टनाइट गेमची क्रेझ आहे. उद्या या गेमची क्रेझ संपली की, दुसरा गेम येईल. मी त्यासाठीही तयार आहे. मी लोकांना नवीन व्हिडीओ गेम शिकणार.