Excessive laughter effect: हसणं आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं आणि स्वत:ही अनुभवलं असेलच. हसल्याने आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. काही लोक हळू गालातल्या गालात हसतात तर काही लोक बिनधास्त जोरजोरात हसतात. अशात आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, जोरजोरात हसणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं होतं. तर यावर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. ही व्यक्ती इतक्या जोरात हसली की, तो थेट बेशुद्ध झाली. नुकतीच ही घटना सोशल मीडियावर समोर आली. या व्यक्तीसोबत असं काही झालं की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं.
हैद्राबादच्या एका ५३ वर्षीय व्यक्ती आपल्या घरी टीव्हीवर एक कॉमेडी शो बघत होती. हा शो बघत असताना ही व्यक्ती इतक्या जोरजोरात हसली की, त्याला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हैद्राबादच्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांनी सांगितलं की, या व्यक्तीसोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा ही व्यक्ती चहा घेत होती. यादरम्यान अचानक चहाचा कप त्यांच्या हातातून सुटला. सोबतच त्यांचा तोल गेला आणि बघता बघता ते जमिनीवर पडले.
काही सेकंदात ते बेशुद्ध पडले. त्यांच्या मुलीने सांगितलं की, तिचे वडील त्यांचे दोन्ही हात जोरजोरात झटकत होते. त्यांची ही स्थिती पाहून कुटुंबियांनी लगेच अॅम्बुलन्स बोलवली. श्याम नावाच्या या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. असंही सांगण्यात आलं की, श्याम यांना त्यांच्यासोबत झालेल्या या घटनेबाबत काहीच आठवत नव्हतं. डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं की, मी रूग्णाची पूर्ण मेडिकल हिस्ट्री जाणून घेतली आणि मग काही टेस्ट केल्या. पण कोणताही आजार असल्याचं काही आढळून आलं नाही. त्यानंतर डॉक्टरांनी कार्डियोलॉजी टेस्टनंतर बेशुद्ध होण्यापासून वाचण्यासाठी एक सल्ला दिला. डॉक्टरांनी त्यांना जास्त न हसणे, जास्त उभं न राहणे आणि जास्त शारीरिक मेहनत न घेण्याचा सल्ला दिला.