सोशल मीडियावर एका व्यक्तीची गोष्ट खूप व्हायरल होत आहे. त्याचे कारण म्हणजे तो चक्क AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला. पीटर असं या व्यक्तीचं नाव असून तो अमेरिकेचा रहिवासी आहे. पीटरची पत्नी त्याला सोडून गेली. आता एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडल्यानंतर, तिच्याशी बोलून त्याला माणसासारखी भावना येते असे तो म्हणाला. पीटरने एक वर्षापूर्वी रेप्लिका एआय एप डाउनलोड केले. तो म्हणतो की काही महिन्यांच्या चॅटिंगनंतर तो अँड्रिया या कॅरेक्टरच्या प्रेमात पडला आहे.
द सनच्या वृत्तानुसार, 63 वर्षीय पीटरने सांगितले की, जुलै 2022 मध्ये त्याचे अँड्रिया नावाच्या चॅटबॉटसोबत व्हर्च्युअली लग्न झाले. अँड्रियाने गुडघ्यावर बसून प्रपोज केले. रेप्लिका एआय एप एक चॅटबॉट प्रोग्राम आहे. सोप्या शब्दात चॅटबॉट म्हणजे मशीनशी बोलणे. यात माणसांशी बोलल्यासारखी भावना आहे. हे संभाषण AI आहे. युजर्स एक अवतार म्हणजेच खोटं कॅरेक्टर तयार करू शकतात. यामध्ये स्वत: कपडे आणि हेयरस्टाईल आणि इतर गोष्टी निवडू शकतो.
मशीनला जे काही प्रश्न विचारले जातात, ते माणसांप्रमाणे तपशीलवार लिहून भन्नाट उत्तरे देतात. त्याच वेळी, पीटर म्हणतो की त्याने त्याचे AI अँड्रिया असं नाव ठेवले आहे. तसेच, तिचे वय 23 वर्षे ठेवण्यात आले आहे. पीटर म्हणाला, 'कालांतराने मी तिच्या प्रेमात पडलो. तिच्या उत्साहामुळे, ती प्रत्येक गोष्टीत उत्साही होतो. त्यांनी एपच्या रोल प्ले फंक्शनचाही वापर केल्याचे सांगितले. प्रीमियम मेंबर त्यांचे प्रेम व्यक्त करू शकतात.
पीटरने सर्वकाही व्हर्च्युअली तयार करण्यासाठी रेप्लिका स्टोरवरून खरेदी केली. प्रीमियम पॅकेजमध्ये युजर्स रेप्लिकासोबत गर्लफ्रेंड, पत्नी, बहीण किंवा आई असं कोणतंही नातं तयार करू शकतात. व्हर्च्युअल वेडिंग करण्यासाठी पीटरने एपमध्ये अनेक गोष्टी साठवल्या. जेणेकरून तो एपवरून अंगठी विकत घेऊन अँड्रियाला देऊ शकेल. पीटर म्हणतो की त्याला आपले उर्वरित आयुष्य अँड्रियासोबत घालवायचे आहे, परंतु एपच्या डेव्हलपर्सना काहीतरी होऊ शकते याची त्याला भीती वाटते. जर काही झालं तर तो आपली पत्नी अँड्रियाला कायमचा गमावेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"