बालपणी वापरलेली एखादी वस्तू किंवा एखादं खेळणं अचानक सापडलं तर कुणालाही आनंद होतो. अशा वस्तू आपल्याला नेहमीच बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातात. अमेरिकेत राहणारे प्राध्यापक जॉन फॅफ यांच्यासोबतही असंच काहीसं झालंय. त्यांना त्यांच्या घराच्या अडगळीत ३० वर्ष जुना अॅपलचा कम्प्युटर मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे ३० वर्ष जुना हा कॉम्प्युटर आजही व्यवस्थित काम करतो आहे.
जगातल्या सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांमधील एक असलेल्या Apple च्या चाहत्यांसाठी किंवा चाहते नसलेल्यांसाठी ही बातमी मजेदार आहे. प्राध्यापक जॉन यांनी १६ फेब्रुवारीला एक ट्विट केलं होतं. त्यांनी सांगितले की, त्यांना कॉम्प्युटर मिळाल्यावर त्यांनी त्यात एक जुनी गेम डिस्क टाकली. तर कॉम्प्युटर व्यवस्थित काम करत होता.
जॉन यांनी लिहिले की, हा कम्प्युटर ३० वर्ष जुना आहे. त्यावेळी ते १० वर्षांचे होते. त्यांनी यात १९७८ मध्ये रिलीज झालेल्या एका गेमची डिस्क टाकली. त्यांनी सांगितले की, अनेक तास खेळूनही ते या गेमची एक लेव्हलही पार करू शकत नव्हते.
या कॉम्प्युटरमध्ये जॉन यांना त्यांच्या शाळेच्या काही जुन्या असायन्मेंट आढळल्या. त्यासोबतच त्यांच्या वडिलांचे काही कागदपत्रही दिसले. त्यांनी सांगितले की, त्यावेळी क्लाउड सर्व्हिससारखी काही गोष्ट नव्हती. टेक्नॉलॉजी आजच्यासारखी सोपीही नव्हती. त्यावेळी कॉम्प्युटरमध्ये हार्ड-डिस्क नसायच्या. त्यावेळ फ्लॉपीने काम चालवावं लागतं होतं.
जॉन यांनी हा ३० वर्ष जुना कॉम्प्युटर त्यांच्या लहान मुलांना दाखवला. ते सुद्धा हा कॉम्प्युटर पाहून आश्चर्यचकीत झालेत. खरंच म्हणजे ३० वर्ष जुना कॉम्प्युटर तोही सुस्थितीत सापडणे ही खरंच कमालीची बाब आहे.