कधी आणि कुठे कुणाचं नशीब चमकेल काहीच सांगता येत नाही. एका व्यक्तीसोबत असंच झालं. सकाळी सकाळी तो पार्कमध्ये फिरण्यासाठी निघाला होता, तेव्हा त्याला रस्त्यात अशी वस्तू सापडली ज्यामुळे तो मालामाल झाला. काही वेळात तो लाखो रूपयांचं मालक झाला होता. पण त्याला जराही अंदाज नव्हता की, जी वस्तू त्याला सापडली ती इतकी महागडी असेल. जेव्हा एक्सपर्टने त्याला सांगितलं तेव्हा तो आनंदाने नाचू लागला.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, फ्रान्समध्ये राहणारा जूलियन नवास फ्लोरिडामध्ये एक रॉकेट लॉन्च बघण्यासाठी अमेरिकेत आला होता. यावेळी मित्रांनी न्यू ऑरलियन्समध्ये बोरबॉन स्ट्रीट बघण्याचा प्लान केला. तिथे जात असताना त्यांना समजलं की, रस्त्यात क्रेटर ऑफ डायमंड पार्क (Crater Of Diamonds State Park) आहे. त्यांनी तिथेही भेट देण्याचं ठरवलं. त्यांनी तिथे एक रात्र थांबण्याचा प्लान केला. हा पार्क हिऱ्याच्या शोधासाठी प्रसिद्ध आहे. इथे हजारो हिरे सापडतात.
पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जूलियन नवास मित्रांसोबत पार्कमध्ये फिरत होता. तेव्हाच त्याला एक चमकदार तुकडा सापडला. नवासला वाटलं की, हा काचेचा तुकडा असेल. त्याने तो खिशात ठेवला. नवासला आधीच एक सोन्याचा तुकडा सापडला होता, पण त्याला हे माहीत नव्हतं की, या काचेच्या तुकड्याने त्याचं नशीब चमकेल. जेव्हा त्याने हा तुकडा एक्सपर्टला दाखवला तेव्हा समजलं की, तो एक 7.46 कॅरेटचा हिरा आहे. ज्याची किंमत कोट्यावधी रूपये आहे.
नवास म्हणाला की, पार्कमधील मातीत हिरा शोधणं अवघड काम आहे. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला हिरा सापडेल. नाही तर अनेकांना तासंतास मेहनत करूनही काही सापडत नाही. आतापर्यंत हजारो लोकांना इथे हिरे सापडले आहेत. ते मालामाल झाले आहेत. डिसेंबरमध्येच एका व्यक्तीला 4.87 कॅरेटचा हिरा सापडला होता.