भारतात वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इलेक्ट्रोनिक वस्तू आणि वाहनांमध्ये तर खूपच जुगाड केले जातात. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. २ वर्षांपूर्वी एका माणसाची कार चोरीला गेली होती. तुम्ही म्हणाल यात नवीन असं काय? रिपोर्ट्नुसार जी कार चोरी झाली होती तीच कार एक पोलिस अधिकारी वापरत होता.
कसा घडला हा प्रकार?
ओमेंद्र सोनी हे कानपूरचे रहिवासी आहेत. ओमेंद्र यांना एके दिवशी सर्विस सेंटरमधून फोन आला. ज्या कारची त्यांनी सर्विंस केली होती. ती आता व्यवस्थित आहे का? अशी विचारणा करण्यात आली. असं विचारल्यानंतर ओमेंद्र गोंधळून गेले. कारण त्यांची कार चोरीला गेली होती. सुमारे २ वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर २०१८ ला ही कार चोरी झाली होती. त्याचवेळी त्यांनी बर्रा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पण त्याची पुढे काहीही माहिती मिळाली नव्हती. जेव्हा सर्विस सेंटरमधून फोन आला तेव्हा त्यांनी पुन्हा तपास करायला सुरूवात केली.
असा लागला तपास
ओमेंद्र सोनी यांनी हिंदूस्थान टाईम्सची बोलताना सांगितले की, ''सर्विस सेंटर वाल्याकडून फोन आल्यानंतर मी गोंधळात पडलो. कारण माझी कार चोरी झाली होती तरिही त्यांनी असे प्रश्न विचारले. त्यांच्याकडे माझ्या कारची सगळी माहिती होती. कारण मी सुरूवातीला त्यांच्याकडून कार सर्विसिंग करून घेतली होती. फिडबॅकसाठी त्यांनी मला फोन केला होता.''
दौंडच्या भीमा नदीत आढळलेल्या शंकराच्या १ टन वजनाच्या मुर्तीचा अखेर उलगडा
पुढे त्यांनी सांगितले की, ''मी जेव्हा सर्विस सेंटरला पोहोचलो तेव्हा मला कळले की, २२ डिसेंबरला एसओ बिठूर कौशलेंद्र प्रताप सिंह यांना २२ डिसेंबरला कार परत केली होती. हे ऐकल्यानंतर मी संतापलो कारण पोलिसांनी कार परत मिळाल्यावर माझ्याशी संपर्क का केला नाही असा प्रश्न मला पडला.''
ही कार वापरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, ही कार त्यांना अज्ञात ठिकाणी दिसून आली होती. त्यानंतर जप्त करण्यात आली. कार कधी मिळाली याबाबत त्यांनी खुलासा केलेला नाही. कानपूर नगर पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा अधिक तपास केला जाणार आहे.