अनेकदा आपण घरामध्ये काही वस्तू ठेवतो आणि नंतर विसरून जातो. ती वस्तू आपण अगदी चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असते, मात्र बरीच शोधूनही ती आपल्याला सापडत नाही. मात्र काही दिवसांनंतर अचानक ती वस्तू आपल्याला समोर दिसते, जी आपण अनेक दिवसांपासून शोधत असतो. परंतु काही वेळा अशाही घटना घडतात ज्या एखाद्या चमत्काराप्रमाणे असतात. असंच एक हैराण करणारं प्रकरण अमेरिकेतून समोर आलं आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेचा आयफोन हरवला होता. भरपूर शोधूनही तिचा फोन सापडला नाही. बरीच शोधाशोध केल्यानंतर महिलेनं हार मानली आणि तिला असं वाटलं की आता फोन सापडणार नाही. मात्र हे जाणून तुम्हीही हैराण व्हाल की दहा वर्षांनंतर तो आयफोन तिच्याच घरात सापडला (Woman Found her Lost Phone After 10 Years).
हा आयफोन तिच्या पतीला टॉयलेटच्या कमोडमध्ये सापडला. महिलेनं आपला आयफोन हरवल्याची आणि १० वर्षांनंतर तो सापडल्याची संपूर्ण कथा सोशल मीडियावर शेअर केली आहे. मिरर यूकेमध्ये आलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये राहाणाऱ्या या महिलेचं नाव बेकी बेकमॅन आहे. एका पार्टीदरम्यान तिचा आयफोन हरवला होता. भरपूर शोधल्यानंतरही तिला तो सापडला नाही.
बेकीचा आयफोन हरवलेल्या घटनेला तब्बल १० वर्ष झाले होते. एक दिवस बेकीचा पती टॉयलेटमध्ये गेला होता. तेव्हा त्याने फ्लश केलं असता कमोडमधून विचित्र आवाज आला. या आवाजावरुन वाटत होतं जणू आतमध्ये काहीतरी वस्तू धडकत आहे. बेकीच्या पतीला वाटलं की कदाचित कमोडमध्ये काहीतरी वस्तू अडकली आहे. जेव्हा त्याने याचा शोध घेतला तेव्हा आतमध्ये आयफोन पाहून तो थक्क झाला. हे गोष्ट जेव्हा बेकीला समजली तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. ती ही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करून इतरांनाही सांगितली.