धकाधकीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती घेऊन आरामात जीव जगण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून दूर राहून एकटं जीवन जगणं आव्हानात्मक असतं. एका व्यक्तीने याच आव्हानात्मक जीवनाचा स्वीकार केला आहे. जवळपास 20 वर्षे तो एका गुहेत एकटा राहिला आहे. मात्र अचानक तो जेव्हा शहरात परत आला. तेव्हा त्याला सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसला. त्याला कोरोनाबाबत काहीच माहीत नसून त्याच्यासाठी हे फारच नवीन होतं. मात्र जेव्हा त्याला कोरोनाबाबत कळलं तेव्हा त्याने उशीर न करता सर्वप्रथम कोरोनाची लस घेतली आहे.
पेंटा पर्ट्रोविक (Panta Petrovic) असं या 70 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ज्यांना आता जगातील सोशल डिस्टंसिंगटचा किंग अशी एक ओळख मिळाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते साऊथ सर्बियाच्या स्टारा प्लानिना येथील गुहेक राहत होते. त्यामुळेच ते गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून आणि समाजापासून दूर होते. 'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, पर्ट्रोविक यांनी स्वत: ला या समाजापासून अलिप्त ठेवलं होतं. धावपळीच्या जीवनाला ते कंटाळले होते. समाधान मिळालं आणि स्वातंत्र्याने जगता यावं म्हणून त्यांनी गुहेत राहण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
गुहेत राहिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा आपल्या शहरात परत आले आहेत. तेव्हा त्यांना जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी लढत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी कोरोनाची लस घेतली. तसेच लोक लस घ्यायला एवढं का घाबरत आहेत हे मला समजत नाही. कोरोनाची लस घ्यावी अशी मी लोकांना विनंती करतो असं देखील पेंटा पर्ट्रोविक यांनी न्यूज एजन्सीला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. कुटुंबासोबत राहत असताना खूप वाद व्हायचे त्यामुळेच गुहेत राहायला निघून आलो. येथे हवं तसं जगता येतं असं देखील पर्ट्रोविक यांनी म्हटलं आहे.
(फोटो - OLIVER BUNIC/AFP)