शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

ऐकावं ते नवलच! पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता?; 26 लाखांचं बिल पाहून लोक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:01 PM

एका व्यक्तीला पाण्याचं भलमोठं बिल आहे. पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खाली जात असून अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होते. अनेक भागात आजही लोकांना कडक उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे पाणी हे जीवन आहे असं म्हणत ते जपून वापरण्याचं आवाहन हे नेहमीच केलं जातं. विजेसारखं पाण्याचं देखील बिल येतं. पण तुम्हाला जर कोणी एखाद्या व्यक्तीला तब्बल 26 लाख रुपये पाण्याचं बिल आलंय असं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. 

एका व्यक्तीला पाण्याचं भलमोठं बिल आलं आहे. पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मलेशियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला आलेल्या पाण्याच्या बिलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिलातील आकडा पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण व्यक्तीला हजार, दोन हजार नाही तर तब्बल 26 लाखांचं पाणी बिल आलं आहे. या व्यक्तीने "We Are All People From Raub" नावाच्या पेजवर हे बिल शेअर केलं आहे. तसेच मी बँकरप्सीसाठी अर्ज करू शकतो का? अशी कॅप्शन त्याने फोटो शेअर करताना दिली आहे.

पाण्याचं हे बिल व्हायरल झाल्यानंतर पाणी वितरण विभागाची ही चूक असू शकते, असं म्हटलं जातं आहे. एक व्यक्ती एवढ्या किमतीचं पाणी वापरूच कशी शकते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या व्यक्तीने सुमारे 99,740m3 पाणी वापरल्याचं बिलात लिहिलं आहे म्हणजेच दीड लीटर कोल्ड्रिंकच्या बाटलीत एवढं पाणी भरलं तर त्यात तब्बल 6 कोटी 64 लाख 93 हजार 333 बाटल्या भरल्या जातील.

लाखो रुपयांचं पाणी बिल पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बिलावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा माणूस काय काम करतो की त्याने इतकं पाणी वापरलं अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरा एक जण म्हणाला, कदाचित याच्यामुळेच माझ्या घरात पाणी येत नाही. त्याचबरोबर अनेकांनी गंमतीत त्यांच्या घरी पाणी नसण्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं आहे. तर आणखी एकाने ही व्यक्ती नक्कीच वॉटर पार्क चालवत असणार, कारण त्याशिवाय इतकं बिल येऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :WaterपाणीJara hatkeजरा हटके