कानात एखादा छोटासा कण गेला तर अगदी अस्वस्थ होतं. अशातच जर एखादा किडा कानात गेला तर काय होईल? विचार करूनच अंगावर काटा आला ना? मग विचार करा फक्त एक किडाच नाही झुरळाचं संपूर्ण कुटुंबच कानात राहत असेल तर? काहीतरीच नाही असं खरचं घडलयं. खुलासा झाल्यानंतर डॉक्टरही हैराण झाले होते.
एका दिवशी कान प्रचंड दुखू लागला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये राहणाऱ्या एलवी नावाच्या व्यक्तीसोबत एक विचित्र घटना घडली. असं सांगितलं जातं की, एक दिवस रात्री झोपताना एलवीच्या कानात प्रचंड वेदना होऊ लागल्या. कुटुंबातील एका सदस्याने कारण शोधण्यासाठी टॉर्चच्या मदतीने कानामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला कानात काहीतरी हालचाल जाणवली. त्यामुळे एलवीला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आलं. जेव्हा डॉक्टरांनी कानाची तपासणी केली तेव्हा फार धक्कादायक खुलासा झाला.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्या व्यक्तीच्या कानात एक झुरळ असल्याने निष्पन्न झालं. फक्त एक झुरळ नव्हतं तर झुरळाचं संपूर्ण कुटुंब त्या व्यक्तीच्या कानात राहत होतं. डॉक्टरांनी स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले की, 'एलवीच्या कानात झुरळ आणि त्याची 10 पिल्लं होती. ते संपूर्ण कानात फिरत होते. एवढचं नाहीतर त्यांनी कानालाही नुकसान पोहोचवलं आहे.'
डॉक्टरांनी व्यक्त केली शंका
डॉय यिजिन यांनी सांगितले की, त्यांनी एक-एक करून कानातून स्रव झुरळं बाहेर काढली आहेत. पिल्लांसोबतच कानात मादा झुरळही होतं. डॉक्टरांनी पुढे सांगितले की, कदाचित एलवीने त्याच्या अंथरूणाच्या बाजूला काहीतरी खाद्यपदार्थ अर्धवट ठेवले असतील आणि ते खाण्यासाठी आलेली झुरळं थेट त्याच्या कानात गेली असतील. पण अद्याप या गोष्टीची माहिती मिळाली नाही की, झुरळं नक्की किती दिवस एलवीच्या कानात राहत होती?