अनेकदा अशा काही घटना कानावर पडतात ज्या ऐकल्यावर डोकं चक्रावून जातं. गेल्या काही दिवसांपासून एक अशीच घटना चर्चेत आहे. ही बातमी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. दक्षिण कॅरोलिनातील वकील अटॉर्नी एलेक्स मडॉफ यांनी स्वत:ला मारण्याची सुपारी एका हिटमॅनला दिल होती. अर्थातच कुणालाही हाच प्रश्न पडला की, मडॉफने असं का केलं? चला जाणून घेऊन यामागचं कारण...
एका रिपोर्टनुसार, स्वत:वर गोळी झाडून घेण्याच्या गुन्ह्यात मडॉफ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलाला ७३ कोटी रूपयांचा लाइफ इन्सुरन्स मिळवून देण्यासाठी हा प्लॅन केला होता. मडॉफ यांनी सांगितलं की, त्यांना वाटत होतं की, त्यांच्या मृत्यूनंतर हे सगळे पैसे त्यांच्या लहान मुलाला मिळावेत. ज्याद्वारे त्यांचा मुलगा त्याचं जीवन आरामात जगू शकेल. (हे पण वाचा : लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे')
काही दिवसांपूर्वीच मडॉफ यांची पत्नी आणि २२ वर्षीय मुलगा पॉल यांची गोळी झाडून कुणीतरी हत्या केली होती. मडॉफ म्हणाले की, ज्याने गोळ्या चालवल्या त्या आऱोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. जेव्हा त्याचा मुलगा पॉलची हत्या झाली. तेव्हा त्याच्यावर अनेक केसेस होत्या. पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर जीवनाशी निराश झालेले मडॉफ यांना नशेची सवय लागली. (हे पण वाचा : बोंबला! छातीत लागली होती गोळी, त्याला वाटलं मांजरीने पंजा मारला आणि मग....)
दरम्यान ही अशाप्रकारची पहिली घटना नाही. याआधीही अनेकांनी इन्शुरन्सच्या पैशांसाठी असे प्लॅन केले आहेत. अशा केसेसमध्ये पकडले गेल्यावर जास्तीत जास्त लोक त्यांची मजबुरी सांगतात. पण कोर्टात अशा केसेसबाबत भावनात्मक बाबींना फार महत्व दिलं जात नाही. त्यामुळे अशा केसेस किचकट असतात. पण जेव्हाकधी अशा घटना घडतात तेव्हा सर्वांसमोर येतातच.