चीनमध्ये स्वत:चं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण त्यावर फारच कठोर निर्बंध आहेत. असं असलं तरी यावर लोक फार विचित्र विचित्र चॅलेंज लोकांना देत असतात. लोक ते स्वीकारतात सुद्धा. सध्या चीनीसोशल मीडियावर #munhuawaistchallange चॅलेंज फार ट्रेन्ड होत आहे. यात लोक आपल्या फेक्सिबिलिटी आणि स्लीम कंबर दाखवण्याचा प्रयत्न करतात.
आता हे चॅलेंज प्रसिद्ध चीनी अभिनेत्री Yang Mi हिनेही घेतलं आणि सोशल मीडियावर हे चॅलेंज पूर्ण करत आपला एक फोटोही शेअर केलाय. आधी तर अभिनेत्रीला आपल्या फिटनेसवरून बरील प्रशंसा मिळाली. पण नंतर लोक संतापले. आणि त्यांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं. कारण हे होतं की, जे चॅलेंज फिटनेसचं असल्याचं सांगितलं जात होतं. त्यात लोक जखमी होण्याचाही धोका जास्त आहे.
अशात देशाभरातील लोकांसाठी रोल मॉडल असलेली अभिनेत्री Yang Mi ने हे चॅलेंच करणं अनेकांना आवडलं नाही. त्यामुळे Yang ने स्वत: तिची चॅलेंजची पोस्ट डिलीट केली. तसेच तिने लोकांनी माफीही मागितली आहे. तिने जारी केलेल्या माहितीत ती म्हणाली की, मी एक अवघड चॅलेंज पाहिलं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण आता लक्षात आलं की, हे चॅलेंज योग्य पद्धतीने केलं गेलं नाही तर व्यक्ती जखमीही होऊ शकतो. मी माफी मागते.
तिने पुढे लिहिले की, 'मला आशा आहे की, सगळे फीट राहतील आणि सर्व प्रकारच्या स्ट्रेचिंगही करतील. पण शरीराकडे लक्ष देऊन हे करा. मी सुद्धा भविष्यात आता जास्त सावध राहणार आहे. पुन्हा एकदा माफी मागते.