चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेकदा पोटात वेदना होतात. त्यानंतर वेदना वेदना वाढतात तेव्हा लोक डॉक्टरकडे जातात आणि मग त्यांची स्थिती बघून त्यांना औषधं देतात. नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तीच्या पोटाच्या खालच्या भागात वेदना होत होती. जेव्हा तो डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरने टेस्ट करण्यास सांगितल्या. रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात अशी वस्तू दिसली जी बघून डॉक्टरही हैराण झाले. ही घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण...
Nypost नुसार एका व्यक्तीच्या पोटाखाली जेव्हा वेदना होत होत्या. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना ब्लड टेस्ट करण्यास सांगितलं. तसेच अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे काढण्यास सांगितलं. जेव्हा रिपोर्ट समोर आला तेव्हा डॉक्टर बघून हैराण झाले. रिपोर्टमध्ये दिसलं की, व्यक्तीच्या यूरिनरी ब्लॅडरमध्ये एक खिळा आहे. ज्यामुळे त्याला इतक्या वेदना होत होत्या.
जिल्हा हॉस्पिटल भिंडचे सर्जन डॉ. प्रतिक मिश्रा यांच्यानुसार, हे समजू शकलं नाही की, व्यक्तीच्या ब्लॅडरमध्ये लोखंडी खिळा कसा गेला. हा खिळा एक वर्षांपासून त्याच्या ब्लॅडरमध्ये अडकला होता. रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. याप्रकरणी व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्याची आर्थित स्थिती चांगली नाही त्यामुळे तो ऑपरेशनचा खर्च करू शकत नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं. सांगितलं जात आहे की, त्याची तब्येत सध्या बरी आहे.
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी एक तास ही कठीण सर्जरी केली. त्यानंतर खिळा बाहेर काढला. डॉक्टरांसाठी हे फार अवघड काम होतं. कारण खिळा टोकदार होता. ब्लॅडर मधून बाहेर काढताना रूग्णाला इजा झाली असती.