शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

फाटक्या कपड्यात कॅन, बाटल्या गोळा करणारा निघाला लखपती; मृत्यूनंतर संपत्ती पाहून सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:05 PM

डेगरमॅन हा कॅन आणि बाटल्या गोळा करण्यासाठी दिवसभर परिसरातील रस्त्यांवर फिरत असे. लोक त्याला नेहमी निळ्या जॅकेट आणि फाटलेल्या पँटमध्ये पाहायचे.

स्वीडनमधील स्केसेफ्टिया या छोट्याशा गावात एका माणसाने रस्त्यावर डबे जमा करून लाखो रुपये कमवल्याची अजब घटना समोर आली आहे. कर्ट डेगरमॅन, ज्याला लोक 'टिन कॅन कर्ट' म्हणत, तो डबे गोळा करायचा आणि पैशासाठी ते विकायचा. डब्बे गोळा करण्यात त्याने 30 वर्षे घालवली आणि या कामातून तब्बल 14 लाखांहून अधिक रुपये कमावले ज्यामुळे लोकांना आता आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

मिंटच्या एका रिपोर्टनुसार, डेगरमॅन हा कॅन आणि बाटल्या गोळा करण्यासाठी दिवसभर परिसरातील रस्त्यांवर फिरत असे. लोक त्याला नेहमी निळ्या जॅकेट आणि फाटलेल्या पँटमध्ये पाहायचे. लोकांनी वापरून झाल्यानंतर फेकलेले कंटेनर शोधत तो रस्त्यावर फिरत असे. गोळा केलेले डबे तो रिसायकलिंग सेंटरला देत असे आणि त्याबदल्यात त्याला पैसे मिळायचे.

या काळात डेगरमॅनला जवळच्या लायब्ररीत जाण्याची सवय लागली. येथील वर्तमानपत्र वाचत असताना त्याची नजर शेअर बाजाराच्या बातम्यांकडे गेली. त्याला शेअर बाजाराच्या बातम्यांमध्ये रस वाटू लागला आणि तासनतास बातम्या वाचायच्या. काही वेळातच तो शेअर बाजारातील तज्ञ बनला आणि कंटेनर विकून कमावलेले पैसे म्युच्युअल फंडात गुंतवू लागला. तो त्याच्या कमाईतील बहुतांशी बचत करत असे, त्यामुळे त्याच्याकडे बरीच बचत होती. 

पैसे वाचवण्यासाठी त्याने कारऐवजी सायकलचा वापर केला असता. त्याचे स्वतःचे एक छोटेसे घर होते. डेगरमॅनने लग्नही केले नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या चुलत भावाला त्याची सर्व मालमत्ता वारसाहक्काने दिली. डेगरमनच्या मालमत्तेबद्दल ऐकून तिथे राहणाऱ्या लोकांना धक्काच बसला. बाटल्या गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे 14 लाख डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असू शकते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

स्वीडनमधील जवळपास 8,000 ते 10,000 लोक कॅन, बाटल्या आणि प्लास्टिकचे कंटेनर गोळा करून पैसे कमवतात आणि उदरनिर्वाह करतात. तो एका पिशवीत सुमारे 200 कंटेनर गोळा करतो आणि प्रत्येकासाठी पाच सेंट मिळवतो. बरेच लोक एका दिवसात सुमारे 100 बॅग कंटेनर गोळा करतात, ज्याच्या बदल्यात त्यांना एक हजार डॉलर्स मिळतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"