जगात अनेक विचित्र लोक असतात जे असे काही कारनामे करतात की, वाचून डोकं चक्रावून जातं. एका व्यक्तीने मुद्दामहून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बॅटरी टाकली. साधारण २४ तास बॅटरी अडकूनच होती आणि डॉक्टरांना ती बॅटरी बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पण हे इथंच संपलं नाही. या घटनेच्या पाच महिन्यांनंतर व्यक्तीला पुन्हा त्रास सुरू झाला आणि यावेळी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने AA बॅटरी (AA Battery) त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली होती. त्यानंतर साधारण २४ तास बॅटरी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्येच होती. मग जेव्हा व्यक्तीला काही त्रास झाला तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. ४९ वर्षीय या व्यक्तीचा हा कारनामा पाहून डॉक्टरही हैराण झाले. कोणतीही सर्जरी न करता डॉक्टरांनी बॅटरी बाहेर काढली.
या घटनेच्या पाच महिन्यांनंतर व्यक्तीला यूरिनरी ब्लॉकेजची समस्या होऊ लागली होती. त्याला लघवी करताना खूप वेदना होत होती. त्यानंतर तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला आणि यावेळी त्याची सर्जरी करावी लागली. मेडिकल टिमने सांगितलं की, बॅटरी व्यक्तीच्या शरीरात २४ तासांपेक्षा जास्त वेळ राहिली होती. त्यामुळे Urethra आणि Corpus Spongiosum वाईट प्रकारे प्रभावित झालं होतं.
काही वर्षाआधी चीनमधूनही एक घटना समोर आली होती. एका व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये Stainless Steel ची Chopstick टाकली होती. या व्यक्तीला त्रास होत होता. पण लाजेमुळे तो डॉक्टरांकडे जात नव्हता. त्यामुळे त्याने स्वत: उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्याने Chopstick आत टाकली.