एका तरूणीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाणं आणि एका गोष्टीचा गैरसमज करून घेणं एका तरूणाला चांगलाच महागात पडला. ज्यावेळी तरूण तरूणीसोबत तिच्या घरात होता तेव्हा त्याला दरवाज्यावर कुणीतरी आल्याचं जाणवलं. त्याला वाटलं तरूणीचा बॉयफ्रेन्ड आला आहे. या भीतीने त्याने तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली.
तरूणाने घाबरून तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारल्यानंतर त्याचे दोन्ही पाय मोडले. नंतर असं समजलं की, तरूणीच्या घराच्या दरवाज्यावर तिचा बॉयफ्रेन्ड आलाच नव्हता. तर तिचे हाउसमेट त्यांच्या कुत्र्यांना फिरवून परत आले होते. हाउसमेटलाच चुकून तिचा बॉयफ्रेन्ड समजलं आणि तिसऱ्या मजल्यावरून त्याने उडी मारली. ज्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला.
'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ही घटना आयरलॅंडच्या Cork शहरातील आहे. इथे एक तरूणीला भेटण्यासाठी डेटवर गेला होता. ज्यावेळी तो तरूणीच्या घरात होता तेव्हा डोर बेलचा आणि दरवाज्याजवळ कुणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. त्याला वाटलं तरूणीचा बॉयफ्रेन्ड आला आणि त्याने तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत.
तरूणाला खाली जखमी अवस्थेत पडलेला पाहून आजूबाजूच्या लोकांनी लगेच अॅम्बुलन्स आणि इमरजन्सी सर्व्हिसला फोन केला. तरूणी आणि तिचे हाउसमेटही धावत आले. कसं तरी त्याला स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. जिथे सांगण्यात आलं की, त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.
सुदैवाने इतक्या उंचावरून उडी मारून त्याचा जीव गेला नाही. सध्या त्याची तब्येत स्थिर आहे आणि लवकरच त्याला हॉस्पिटलमधून सुट्टी दिली जाणार आहे. रिपोर्टमध्ये तरूण आणि तरूणीच्या नावाचा खुलासा केलेला नाही.