आजच्या काळात टेक्नॉलॉजीने फारच विकास केला आहे. आज गरजांनुसार लोकांसाठी वस्तू तयार केल्या जातात. आधीच्या काळात मनुष्य साधनांच्या अभावी आपल्या गरजाही व्यक्त करत नव्हते. यात महत्वाची गरज म्हणजे शारीरिक गरज. जर एखाद्या व्यक्तीची ही गरज पार्टनरकडून पूर्ण होत नसेल तर आपलं नशीब समजून ती व्यक्ती गप्प बसत होती. पण आजच्या काळात बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्याचा वापर लोक बिनधास्त करतात.
या टॉइजचा वापर लोक आपल्या प्लेजरसाठी करतात. पण ज्या वस्तूंचा काही फायदा आहे, त्यांचे काही साइड इफेक्ट्सही असतात. चेक रिपब्लिकमध्ये या टॉइजचा वापर जीवघेणा ठरला. एका व्यक्तीच्या मृतदेहाजवळ अनेक टॉइज सापडले. यातील एका इलेक्ट्रिक टॉयचा वापर करताना त्याला शॉक लागला आणि त्याचा जीव गेला. ही वस्तू त्याच्या शरीरात सापडली.
या व्यक्तीचा मृत्यू शॉक लागल्याने झाला. त्याने प्लेजरच्या नादात पिंग-पॉंग बॉलच्या शेपच्या एका टॉयचा म्हणजे खेळण्याचा वापर केला होता. त्याने हे खेळणं शरीरात टाकलं. जेव्हा ते ऑन केलं तेव्हा त्यात काहीतरी बिघाड झाला. बॉलच्या आतील वायरमध्ये शॉर्ट सर्किट झालं. अशात त्याला शॉक लागला. त्याला बॉल बाहेर काढण्याची वेळच मिळाली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचं वय 30 वर्षे होतं. तो त्याच्या आई-वडिलांसोबतच राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने रूम आतून लॉक केली होती. त्यानंतर त्याचा शॉक लागून मृत्यू झाला. बराचवेळ दरवाजा उघडला नाही तेव्हा त्याच्या पालकांना शंका आली. त्यांनी पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडला आणि तेव्हा त्यांना मृतदेह आढळून आला.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीची बॉडी फारच अजब स्थितीत होती. त्याने महिलेचा स्विम सूट घातलेला होता. सोबतच त्याच्या पायात आणि गळ्यात दोरी बांधलेली होती. आता चौकशी केली जात आहे की, त्याचा मृत्यू चुकून झाला की कुणी त्याची हत्या केली.