फारच आश्चर्यकारक वाटतं जेव्हा समजतं की, एक व्यक्ती आपल्या जीवनात एकाही महिलेला न बघता मरण पावला. पण हे सत्य आहे. एक व्यक्ती 82 वर्ष जगली पण त्याने इतक्या वर्षात एकाही महिलेला पाहिलं नाही.
डेलीमेलच्या एका रिपोर्टनुसार, ग्रीसच्या हल्कीदीकीच्या मिहेलो टोलोटोस (Mihailo Tolotos) ने महिलांबाबत केवळ आपल्या मित्रांकडून, पुस्तकातून आणि कल्पनांमधून जाणलं होतं. पण कधीच कोणत्याही महिलेला पाहिलं नाही.
जन्मानंतर लगेच वारली आई
असं मानलं जातं की, त्यांचा जन्म 1856 मध्ये झाला होता. पण जन्म दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या आईचं निधन झालं होतं. टोलोटोस अनाथ झाले. त्यांना ग्रीसमध्ये माउंट एथोसच्या एका मठात रूढीवादी भिक्षुनां सुपुर्द करण्यात आलं. जिथे त्यांची वाढ झाली.
मठाच्या कठोर नियमांनुसार टोलोटोस मोठे झाले. इथे महिलांना येण्याची परवानगी नव्हती. दहाव्या शतकापासून हा नियम इथे लागू आहे. आजही इथे महिलांना जाता येत नाही. यामागचं कारण हे होतं की, माउंट एथोसच्या सगळ्या मठांमध्ये राहणारे सगळे भिक्षु आयुष्यभर ब्रह्मचारी होते.पण टोलोटोस जगातला सगळ्यात सुंदर नजारा आणि आपल्या लिंगाच्या विरूद्ध एखाद्या सदस्याला सहजपणे भेटू शकत होते. पण त्यांनी कधीच माउंट एथोसला सोडलं नाही. ते कधीच इथून बाहेर गेले नाहीत.
1938 मध्ये 82 वर्षांचे असताना टोलोटस यांचं निधन झालं. माउंट एथोसेच्या लोकांकडून त्यांना खास पद्धतीने दफन करण्यात आलं. त्यांचं अस मत होतं की, ते जगातील एकमेव असे व्यक्ती होते, ज्यांचं महिला कशी दिसते हे न बघताच त्यांचं निधन झालं होतं.
इतकंच नाही तर एका वृत्तानुसार, टोलोटोस यांनी महिलांशिवाय कधीच कार, विमान किंवा सिनेमा पाहिला नव्हता. वृत्तात लिहिलं आहे की, ना त्यांनी एखादं गाडी, ना सिनेमा ना विमान पाहिलं होतं. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं. ते मठात वाढले. जिथे महिलांना प्रवेश नव्हता.