माणसांसाठी घरात राहणं हे अत्यंत सुरक्षित आहे, परंतु ते अनेकदा विविध कारणांमुळे खूप महाग आहे. वीजबिल, पाणी बिल, मेंटेनेन्स इत्यादी सर्व प्रकारचे खर्च घरासोबत येतात. पण एक व्यक्ती अशी देखील आहे जी जवळपास 8 वर्षांपासून त्याच्या कारमध्ये राहत आहे.
कारमध्ये राहत असल्याचे अनेक फायदे झाल्याचे ते सांगतात. अमेरिकेतील एरिझोना येथे राहणारा 32 वर्षांचा निकोलस बाउर सांगतो की, त्याने हे सर्व पैसे वाचवण्यासाठी केले आहे. तो म्हणतो, 'जेव्हा तुम्हाला भाडं भरावं लागत नाही, बिल भरावं लागत नाहीत, तेव्हा खूप पैसे वाचतात.'
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, कारमध्ये राहणं हा एक चांगला पर्याय आहे. याद्वारे त्यांनी घर घेण्याइतके पैसे वाचवले आहेत. यासाठी तो केवळ त्याच्या नोकरीवर अवलंबून नाही. गाडीत राहिल्यामुळे घरभाडंही खूप वाचतं.
बाउरने सांगितलं की, तो 2015 पासून कारमध्ये राहू लागला. त्यावेळी ते ऑटोमोटिव्ह इंजिनीअर होता. त्याच्यावर मोठे कर्ज होते. त्याला घरभाडं वाचवायचं होतं. हे टाळण्यासाठी त्याने गाडीतच थांबण्याचा निर्णय घेतला.
आता त्याच्याकडे राहण्यासाठी फिरतं घरही आहे. मोबाईल होमबद्दल बोलायचं झालं तर त्यात बेडपासून लाकडी फ्लोअरिंगपर्यंत सर्व काही आहे. 40 इंच फ्लॅट टीव्ही आणि इंटरनेट सारख्या सुविधाही आहेत. पण बाथरूमच्या बाबतीत काही समस्या आहेत.
दोन मिलिटरी ट्रक एकत्र करून त्याने हे घर तयार केलं आहे. त्याची पार्टनर गरोदर राहिल्यानंतर त्याला मोबाईल होम घ्यावं लागलं. त्याच्याकडे स्वतःचं जुनं कारमधलं घर देखील आहे. तो आपल्या कुटुंबासह मोबाईल होममध्ये राहतो.
अलीकडेच त्याने नोकरी गमावली. तो म्हणतो की त्याला याची काळजी नाही कारण त्याला भाडं द्यावं लागत नाही किंवा कर्जही नाही. उर्वरित खर्चासाठी चांगली रक्कम बचत केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.