समुद्रात स्रवात मोठा मासा हा व्हेल मासा असतो. एक परिवार समुद्रात फिरायला गेला होता. इतक्यात त्यांच्या बोटवर व्हेलने हल्ला केला. झालं असं की, एक व्यक्ती बोटमधून थेट समुद्रात पडली. व्हेलने इतक्या वेगाने हल्ला केला होता की, कुणाला काही समजलंच नाही.
ही घटना आहे ३ एप्रिलची. दक्षिण आफ्रिकेतील Algoa Bay ची ही घटना आहे. Marino Gherbavaz आणि त्यांची मुलगी दोघेही व्हेल बघण्यासाठी क्रूजवर गेले होते. यादरम्यान व्हेल मासा स्नॅक्ससाठी बोटीजवळ येत होता. अशात ४० टन वजनाचा एक व्हेल मासा बोटच्या साइडला टक्कर देऊन गेला.
मिररच्या रिपोर्टनुसार, अंदाजे ४० वजन असलेला व्हेल मासा बोटीला धडकला. अशात मारिनो पाण्यात पडला. पाण्यात व्हेल मासा होता. त्याच्या मुलीने सांगितले की, जसं तिने पाहिलं की, वडील समुद्रात पडले आहेत. ती टेंशनमध्ये आली. ती सांगते की, नंतर तिला समजलं की, तिचे वडील ठीक आहेत आणि बोटीवर चढले आहेत. तेव्हा ती शांत झाली. सुदैवाने व्हेलने या व्यक्तीला काही नुकसान पोहोचवलं नाही.