शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

डोक्यात गोळी लागली तरी त्याला नव्हती कल्पना, रक्त पुसून पुन्हा पार्टीत होता गुंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 2:19 PM

तो पार्टी करण्यात इतका बिझी झाला की, त्याला गोळी लागल्याचं जाणवलं नाही आणि अनेक दिवस मजेत पार्टी करत राहिला.

जगात अनेक अजब लोक आहेत. सामान्यपणे आपल्या खरचटलं तरी ते जाणवतं आणि त्यावर आपण उपचार शोधतो. पण एक असा तरूण आहे ज्याला बंदुकीची गोळी लागली तरी त्याला समजलं नाही. तो पार्टी करण्यात इतका बिझी झाला की, त्याला गोळी लागल्याचं जाणवलं नाही आणि अनेक दिवस मजेत पार्टी करत राहिला.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तरूणाच्या डोक्यात वेदना झाल्या आणि रक्तही आलं. पण त्याने पार्टीत नशेत रक्त पुसलं आणि नाचत राहिला. इतकंच नाही तर पार्टी संपल्यावर 300 किलोमीटर दूर आपल्या घरी गाडी चालवत गेला. दोन-तीन दिवस त्याला समजलंच नाही की, त्याला गोळी लागलीये.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, ब्राझीलच्या रियो दि जेनेरियला राहणारा मॅटियस फॅसियो नावाचा तरूण आपल्या मित्रांसोबत न्यू इअर पार्टी करत होता. यादरम्यान त्याच्या डोक्याला काहीतरी लागलं. त्याला वाटलं दगड असेल. त्याने त्या जागेवर आईस लावला. रक्त थांबलं तेव्हा तो पुन्हा पार्टी करू लागला. नंतर गाडी चालवत घरी गेला. पुढील दोन दिवस तो कामात बिझी होता आणि नंतर पुन्हा मित्रांसोबत पार्टीकेली. अखेर 4 जानेवारीला जेव्हा त्याच्या डाव्या हातात वेदना झाल्या तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला.

डॉक्टरही झाले हैराण

डॉक्टरांनी जेव्हा सीटी स्कॅन केलं तेव्हा समोर आलं की, त्याच्या डोक्यात गोळी लागली आहे. मेडिकल स्टाफही हे बघून हैराण झाला की, त्याच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि त्याला माहितही नाही. डॉक्टरांनी सर्जरी करून गोळी काढली. गोळी 9 एमएम बुलेट होती आणि मॅटियसच्या मेंदुच्या एका भागात लागली होती. जिथे मेंदुला फार होणार नाही. त्यामुळेच त्याला गोळी लागल्याचं  समजलं नाही. पण पुढे जाऊन हे इन्फेक्शन आणि त्याच्या मृत्यूचं कारण बनली असती. आता तो ठीक आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल