शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

पतीने पत्नीला घटस्फोट दिला, नंतर असं काही समजलं की, पुन्हा तिच्याशी केलं लग्न; लोक करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:00 IST

Man Remarries Ex Wife: एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता, पण नंतर त्याला पत्नीबाबत असं काही समजलं की, त्याने पुन्हा तिच्यासोबत लग्न केलं.

Man Remarries Ex Wife: जगभरातून घटस्फोटांच्या घटना समोर येत असतात. पण विचार करा की, एका कपलने घटस्फोट घेतला आणि असं काही घडलं की, दोघांनी पुन्हा एकमेकांशी लग्न केलं. असं फार क्वचित बघायला मिळतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता, पण नंतर त्याला पत्नीबाबत असं काही समजलं की, त्याने पुन्हा तिच्यासोबत लग्न केलं. या कपलची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, चीनी सोशल मीडियावर ही कहाणी या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर समोर आली. हा व्हिडीओ मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसच्या बाहेरचा आहे. व्हिडीओत ही व्यक्ती सांगत आहे की, कपल आपल्या लग्नाचा आनंद फूल आणि वाईनने साजरा करतात. पण आमचं सत्य आहे ते रडणं आणि जीवन वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारणं.

या व्यक्तीने पुढे सांगितलं की, घटस्फोट दोघांच्या रागामुळे झाला होता. तरीही ते सोबत राहिले. ही तिच व्यक्ती आहे ज्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन काही दिवसांनंतर पुन्हा तिच्याशी लग्न केलं. या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. पण त्याला जसं समजलं की, त्याच्या पत्नीला गंभीर आजार झाला आहे. तेव्हा त्याने पुन्हा तिच्यासोबत लग्न केलं.

रिपोर्टनुसार, या कपलमध्ये काही कारणावरून वाद झाला होता आणि मग दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या काही दिवसांनंतरच त्याला समजलं की, पत्नीला दोन आठवड्यांआधीच अल्पास्किटक एनीमिया नावाचा आजार झाला होता. ज्या दिवशी महिलेला आयसीयूमध्ये भरती व्हायचं होतं, त्याच्या एक दिवसआधीच पतीने त्याच्या घटस्फोटीत पत्नीसोबत पुन्हा लग्नाचा अर्ज दाखल केला. सोशल मीडियावरील लोक या कपलचं भरभरून कौतुक करत आहेत.

टॅग्स :chinaचीनmarriageलग्नJara hatkeजरा हटके