शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

दुबईहून नोकरी सोडून प्रेमासाठी गावी परतला प्रियकर, प्रेयसीसोबत पोलीस स्टेशनमध्ये केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:37 AM

गोपालगंजमध्ये भोरे पोलीस स्टेशन परिसरातील खजुरहां गावात राहणारा आनंद कुमारच्या बहिणीचं लग्न इमिलिया गावात झालं होतं.

असं म्हटलं जातं की, खरं प्रेम असेल तर व्यक्ती कोणत्याही सीमा पार करून येतो. अशीच एक घटना गोपालगंजमधून समोर आली आहे. इथे  एक तरूण आपलं प्रेम मिळवण्यासाठी दुबईमधील नोकरी सोडून आपल्या गावी परतला आणि पोलीस स्टेशन आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. 

गोपालगंजमध्ये भोरे पोलीस स्टेशन परिसरातील खजुरहां गावात राहणारा आनंद कुमारच्या बहिणीचं लग्न इमिलिया गावात झालं होतं. बहिणीकडे येत-जात असताना यादरम्यान याच गावातील संजना कुमारी नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम जडलं. अशातच तो याच काळात त्याला नोकरी लागल्याने तो दुबईला गेला. पण जाताना तो प्रेयसीला हे सांगून गेला की, तो लवकरच परत येईल आणि तिच्यासोबत लग्न करेल.

नोकरी सोडून प्रेमासाठी गावी परतला

तो दुबई असताना नेहमीच प्रेयसीला लग्नाची आठवण करून देत होता. मात्र, जेव्हा संजनाच्या कुटुंबीयांना दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत समजलं तेव्हा त्यांनी संजनासाठी दुसरा मुलगा शोधण्यास सुरूवात केली. याची माहिती संजनाने आनंदला दिली. आनंदला ही माहिती मिळताच सगळं काही सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. नोकरी सोडून त्याने प्रेयसीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. (हे पण वाचा : वाह रे वाह! पत्नीनेच पतीला दिली २ गर्लफ्रेन्ड्ससोबत लग्न करण्याची संमती; म्हणाला, "दुसरे माझ्यावर जळतात")

नोकरीचा दिला राजीनामा

आनंद घाईघाईने दुबईतील त्याच्या कंपनीत नोकरीचा राजीनामा दिला आणि रविवारी थेट आपल्या गावी पोहोचला. पण तो घरी गेला नाही. आनंद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने प्रेयसीलाही पोलीस स्टेशनमध्ये बोलवून पोलिसांना मदत मागितली. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सर्वातआधी दोघांच्याही कुटुंबीयांना बोलवलं  आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

पोलीस स्टेशनमधील मंदिरात लग्न

पोलीस अधिकारी सुभाष कुमार यांनी सांगितलं की, दोघेही वयस्क आहेत आणि दोघेही लग्न करण्यास तयार आहेत. आनंद आणि संजनाचं लग्न पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. प्रेमीयुगुलाच्या या लग्नात पोलीस वराती होते आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला. 

सध्या या भागात या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या लग्नात ना बॅंडबाजा होता ना लोकांची गर्दी. दोघांच्याही परिवारातील काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांना आशीर्वाद दिला. हे लग्न झाल्याने दोघेही आनंदी आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके