शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

रोमँटिक डेटवर गेलेल्या तरुणाला बसला धक्का जेव्हा एंट्री झाली अनोळखी माणसाची...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 8:11 PM

अनेक तरुण आणि तरुणी ऑनलाईन डेटिंग साईटवर (online dating site) भेटतात, ओळख होते, जुजबी गप्पा होतात आणि नंतर दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतात. अशाच प्रकारे एका तरुणीसोबत डेटसाठी भेटलेल्या तरुणाने त्याला आलेला भयंकर अनुभव शेअर केला आहे. 

एका तरुणाची महिलेसोबत डेटिंग (date with woman) सुरू असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती (strange person) टेबलवर येऊन बसली आणि सगळेच अवघडून गेले. सध्या डेटिंगचा जमाना आहे. अनेक तरुण आणि तरुणी ऑनलाईन डेटिंग साईटवर (online dating site) भेटतात, ओळख होते, जुजबी गप्पा होतात आणि नंतर दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतात. अशाच प्रकारे एका तरुणीसोबत डेटसाठी भेटलेल्या तरुणाने त्याला आलेला भयंकर अनुभव शेअर केला आहे. 

अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या तरुणाची एका डेटिंग ऍपवर ओळख झाली. दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. तारीख ठरली, ठिकाण ठरलं. दोघंही एकमेकांना ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी भेटले. गप्पा सुरू झाल्या. हळूहळू गप्पा रंगत गेल्या आणि डेट रोमँटिक होऊ लागली. दोघांनाही या डेटवर मजा येत होती. ड्रिंक्स आणि जेवण संपवून दोघांनीही सिनेमा पाहायला जाण्याचा बेत केला होता. मात्र तेवढ्यात एक विचित्र घटना घडली. 

दोघांच्याही रोमँटिक गप्पा रंगात आल्या असताना अचानक एक अनोळखी पुरुष त्यांच्या टेबलवर येऊन बसला. त्याला पाहून महिलेच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हा पुरुष नेमका कोण आहे, हे आपल्याला कळत नव्हतं. न राहवून आपण त्या व्यक्तीला त्याची ओळख विचारली. त्यावर आपण या महिलेचा पती असल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकून तरुणाला काय करावं, तेच कळेना. 

तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर लग्नाला ७ वर्षं झाल्याचं त्यानं सांगितलं. तरुण त्याला बसलेला धक्का पचवत असतानाच आणखी एक घटना घडली. टेबलपासून काही अंतरावर उभी असणारी एक लहान मुलगी आई, आई असं ओरडत टेबलकडे धावत आली. ते पाहून तरुण इतका घाबरला की त्याने डेट सोडून सरळ तिथून पळ काढला. तरुणाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका