ही व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्याधीश बनली. तो सध्या केवळ एक फिटनेस इंटरप्रेन्योरच नाही तर एका कंपनीचा सीईओ सुद्धा आहे. याचं नाव क्रिस कॅवालिनी आहे. क्रिसने पुरूषांना सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, त्याची जर एक गोष्ट ऐकली तर तर श्रीमंत बनलण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. 40 वर्षीय क्रिस याआधीही चर्चेत आला होता. त्याने वजन वाढलेल्या पुरूषांना हेल्दी राहण्यासाटी काही टिप्स दिल्या होत्या. आता तो म्हणाला की, पुरूषांना बस एक गोष्ट करू नये आणि त्याऐवजी आपल्या पर्सनल ग्रोथ, फिटनेस आणि बिझनेस वाढवण्यावर भर द्यावा.
त्याचं मत आहे की, ज्या गोष्टीबाबत तो सांगत आहे ती अश्लीलतेशी जुळलेल्या गोष्टींपासून दुरावा आहे. अशी कोणतीही अॅक्टिविटी असो किंवा अॅडल्ट फिल्म किंवा कंटेंट बघणं. जर पुरूष याद्वारे आपलं मनोरंजन करत असतील, तर त्यांनी लगेच ते बंद करावं. क्रिस कंपनी न्यूट्रिशन सल्यूशन्सचा सीईओ आहे. त्याचं मत आहे की, अॅडल्ट सिनेमे फायनान्शिअल आणि पर्सनल सक्सेसमध्ये आडकाठी ठरतात. या गोष्टींमुळे पुरूष अश्लील गतिविधींकडे धकलले जातात. त्याचं मत आहे की, जर तुम्ही शिस्तीत राहू शकत नसाल तर, आपल्या जीवनावर फोकस करू शकणार नाहीत. क्रिस अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहतो.
तो म्हणाला की, अश्लील सिनेमे पाहिल्याने व्यक्तीची प्रेरणा शक्ती कमी होते. त्यांची ग्रोथ नष्ट होते. त्यासोबतच ते फिटनेस, परिवार, फायनान्स किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये सुधारणा करू शकत नाही. त्याचं मत आहे की, जे तो सांगत आहे ते काही लोकांना आवडणार नाही. अशात हे समजून घेतलं पाहिजे. जर लोकांनी त्याचं मत ऐकलं आणि दोन आठवड्यांसाठीही हे सगळं बंद केलं तर मोठा फरक दिसून येईल.
क्रिसचे इन्स्टावर एक लाख 46 हजार फॉलोअर्स आहेत. तो कोचिंग सर्विससाठी आपल्या क्लाएंट्सकडून दरवर्षी 50 हजार डॉलर वसूल करतो. त्याचं मत आहे की, या अश्लील गोष्टींच्या संपर्कात राहिल्याने बॉडी आणि मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो. जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शिस्त असणं फार गरजेचं आहे. त्याने लोकांना सल्ला देत सांगितलं की, आपलं आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष द्या. या दोन्ही गोष्टी आत्म सुधारसाठी फार महत्वाच्या आहे. त्याने जास्तीत जास्त लोकांना जिम जाण्यासही सांगितलं आहे.