असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा रंग-रूप बघत नाहीत. ते केवळ एकमेकांचं मन आणि व्यक्तीत्वावर प्रेम करतात. अनेक लोक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात. नुकतंच इजिप्तच्या एका व्यक्तीसोबत असं झालं. त्याने फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीला पसंत केलं आणि दोघांनी लग्नही केलं. पण जेव्हा पहिल्यांदा त्याने नव्या नवरीला विना मेकअप पाहिलं तर त्याला धक्का बसला.ही बातमी वाचून काही लोकांना वाटत आहे की, ही एखाद्या कॉमेडी सीरिअलची कहाणी आहे. पण हे सत्य आहे.
रिपोर्टनुसार, इजिप्तमध्ये राहणारी एक व्यक्ती फेसबुकवर एका तरूणीच्या प्रेमात पडला. महिला नेहमीच सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत होती. या व्यक्तीची आणि महिलेची २-३ वेळा भेटही झाली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण खरी समस्या लग्नाच्या दुसऱ्या सकाळी उभी झाली. त्यावेळी त्याने पहिल्यांदा पत्नीला विना मेकअप पाहिलं.
म्हणाला - माझी फसवणूक झालीये
हेलियोपॉलिसच्या फॅमिली कोर्टात व्यक्तीने सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीला लग्नानंतर विना मेकअप पाहून त्याला धक्का बसला. तो म्हणाला की, ती मुळात आपल्या फेसबुक फोटोजमध्ये फार वेगळी दिसते. ती म्हणाली की, त्याची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्याला घटस्फोट हवाय. तो पुढे म्हणाला की, 'तिने मला अंधारात ठेवला. कारण लग्नाआधी ती फार मेकअप करत होती. ज्यामुळे तिचा खरा चेहरा समजत नव्हता. पण लग्नानंतर विना मेकअप बघून समजलं की, ती फारच कुरूप आहे. त्यामुळे मला घटस्फोट हवा'.
झोपून उठल्यावर बदलतो पत्नीचा चेहरा
या व्यक्तीने सांगितलं की, लग्नाच्या साधारण १ महिन्यापर्यंत तो पत्नीचा चेहरा सहन करण्याचा प्रयत्न करील राहिला. पण दरम्यान त्याला फसवणूक झाल्याची जाणीव होत राहिली. त्यामुळे त्याने एक महिन्यानंतर घटस्फोटाचा अर्ज टाकला. तो म्हणाला की, 'मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिला विना मेकअप बघत आहे. जेव्हा ती झोपून उठते तेव्हा तिचे केस विस्कळीत असतात. ती आधीसारखी अजिबात दिसत नाही'.