आरोग्य विषयक काही समस्या या आपण हलक्यात घेतो. त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते आपल्याला चांगलंच महागात पडू शकतं. अनेकदा त्याचे अनेक गंभीर परिणाम हे भोगावे लागू शकतात. शरीरावर त्याचा वाईट परिणाम होता. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीला खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास जाणवत होता. पण डॉक्टरकडे जाताच व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. रिपोर्टमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. ज्यामुळे डॉक्टर देखील हैराण झाले.
एका 38 वर्षीय व्यक्तीला खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे त्याने माऊंट सिनाई नावाच्या एका क्लिनिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जेथे त्याला एक असं सत्य समजलं जे समजल्यावर तो हादरलाच. नेमकी समस्या समजून घेण्यासाठी रायनोस्कोपी करण्यात आली. रायनोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या नाकाची तपासणी करण्यासाठी नाकामध्ये एक ट्यूब टाकली जाते. त्या ट्यूबमध्ये एक छोटासा कॅमेरा देखील असतो.
तपासणीमध्ये रुग्णाच्या नाकाच्या पाठच्या बाजुस एक दात आल्याचं पाहायला मिळालं. जो एखाद्या हाडासारखा दिसत होता. डॉक्टरांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये डिसेंबरमध्ये एक रिपोर्ट व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतीही जखम झालेली नव्हती किंवा डोकं किंवा चेहऱ्यावर काही वेगळपण पाहायला मिळालं असं म्हटलं आहे. ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. सागर खन्ना आणि डॉ. मायकल टर्नर यांनी याची नीट तपासणी केली असता त्यांना नाकामध्ये एक सफेद रंगाची कडक गोष्ट दिसली.
14 मिलीमीटरचा दात होता. डॉक्टरांना तो बाहेर काढण्यात आता यश आलं आहे. हा हटवण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी यामध्ये सर्व गोष्टी नॉर्मल आढळून आल्या आहेत. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत नाही. अशा समस्या या जेनेटिक असून त्या याआधी देखील समोर आल्या आहेत. तर काही रुग्णांमध्ये कोणतंच याबाबत लक्षण दिसून येत नाही. स्कॅन करताना चुकीच्या ठिकाणी दात आल्याचं समोर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.