राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचौरमध्ये एका कंपनीत अकाउन्ट विभागात काम करणाऱ्या तरूणाने एक-एक करून 56 ब्लेड गिळले. त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. अशात त्याच्या मित्रांनी त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर रिपोर्ट पाहून ते हैराण झाले. व्यक्तीच्या गळ्यात गंभीर जखमा दिसल्या आणि पोटात अनेक ब्लेड होते. सात डॉक्टरांच्या टीमने 3 तास ऑपरेशन करून पोटातून ब्लेड काढला. त्यांनी कसातरी तरूणाचा जीव वाचवला.
तरूणाच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. डॉक्टर नरसी राम देवासी यांनी आधी यशपालचा एक्स-रे काढला आणि मग सोनोग्राफी केली. तेव्हा त्याच्या पोटात अनेक ब्लड दिसून आले. त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी त्याची एंडोस्कोपी करण्यात आली. मग पोटातील ब्लेड काढण्यासाठी इमरजन्सी ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टर नरसी राम देवासी यांच्यानुसार, तरूणाला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्याचं ऑक्सिजन 80 होतं. टेस्ट केल्यानंतर पोटातून ऑपरेशनच्या माध्यमातून 56 ब्लेड काढण्यात आले. सध्या तरूणाची स्थिती स्थीर आहे.
डॉक्टर नरसी राम देवासी यांनी सांगितलं की, यशपालने कवरसोबत 2 पॅकेड ब्लेड गिळले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, तरूणाला एंजायटी किंवा डिप्रेशन असेल ज्यामुळे त्याने तीन पॅकेट ब्लेड गिळले होते. त्या पॅकेटसोबत ब्लेड गिळले नसते तर गळ्यातच अडकले असते. आत गेले नसते. ब्लेड पोटात गेल्यावर कव्हर गळून पडलं, ज्यामुळे पोटात कट लागल्याने रक्त येऊ लागलं होतं. याच कारणाने तरूणाला रक्ताच्या उलट्या झाल्या. सर्जरी करून ब्लेड काढण्यात आले आणि पोटात झालेल्या जखमांवरही उपचार करण्यात आले.