लहान मुलं खेळता खेळता एखादी वस्तू गिळतात हे आपण समजू शकतो. पण एखादा प्रौढ व्यक्ती असे काहीतरी करतो तेव्हा विश्वास बसत नाही. चीन (china) मधील एका व्यक्तीने दात (teeth) घासता घासता टूथब्रश (toothbrush) गिळला.
ही घटना चीन मधील तैजू येथील आहे. या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं की, सकाळी झोपेतून उठताच तो तयार व्हायला निघाला. सकाळी उठल्यावर अर्धवट झोपेत असल्याने त्याने ब्रश घट्ट पकडला नव्हता. त्याने आपले आतले दात साफ करायला सुरवात करताच ब्रश त्याच्या हातातून निसटला. तो सरळ त्याच्या तोंडात आतमध्ये गेला. हा ब्रश १५ सेमी लांब होता. ब्रश गिळल्याचे समजताच तो झोपेतून खडबडून जागा झाला. त्याने घशात हात घातल्यावर ब्रशचा मागचा भाग त्याच्या हाताला लागत होता. मात्र त्याला पकडायला गेल्यावर ब्रश आणखी आत जात होता.
ब्रश पूर्णपणे आत गेल्यानंतर त्याला उलटी झाली. त्यानंतर तो ताबडतोब कारने जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे (X-Ray) काढला. एक्स-रे मध्ये ब्रश दिसताच डॉक्टरांनी त्याच्या पोटाचे ऑपरेशन केले. ऑपरेशन सुरू असताना तो ब्रश खूप घरसत होता. त्यामुळे तो पकडून बाहेर काढणं शक्य होत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय उपकरण वापरून तो ब्रश बाहेर काढला.
डॉक्टरांनी सांगितलं की, त्या व्यक्तीकडून ब्रश गिळला गेल्यानंतर तो ताबडतोब माझ्याकडे आला. हे त्याने खूप चांगले केले. जर त्याने पारंपरिक पद्धतीचा वापर करून म्हणजेच तांदूळ किंवा व्हिनेगर खाऊन ब्रश बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्याची अन्ननलिका पूर्णपणे खराब झाली असती.