एका व्यक्तीने नोकिया ३३१० हा फोन गिळला होता. त्यानंतर त्याची सर्जरी करून हा फोन त्याच्या पोटातून काढण्यात आला. कोसोवोमध्ये प्रिस्टीना येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने नोकिया कंपनीचा जुना लोकप्रिय फोन गिळला होता. फोनचं हे मॉडेल कंपनीने २००० साली लॉंच केलं होतं.
फोन गिळल्यावर तो त्याच्या पोटात जाऊन अडकला आणि नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे डॉक्टरांनी सुरक्षितपणे त्याच्या पोटातून फोन काढला. व्यक्तीचं स्कॅन आणि टेस्ट केल्या गेल्या तर फोन मोठा असल्याचं दिसलं. फोनच्या बॅटरीमद्ये धोकादायक रसायन असल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
सुदैवाने या व्यक्तीची सर्जरी यशस्वी झाली आणि फोन पोटातून काढण्यात आला. ऑपरेशननंतर लगेच डॉक्टर तेलजाकूने फोनचे फोटो आणि एक्स-रे फेसबुकवर शेअर केले. डॉक्टरांनी सांगितलं की, 'मला एका रूग्णाबाबत फोन आला होता. त्याने एक वस्तू गिळली होती. स्कॅन केल्यावर आम्हाला दिसलं की, फोन तीन भागात विभागला गेला आहे.
ते म्हणाले की, 'तीन भागांपैकी बॅटरीने आम्हाला जास्त चिंतेत टाकलं होतं. कारण शक्यता होती की, या व्यक्तीच्या पोटात बॅटरीचा स्फोट झाला असता'. मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती पोटात दुखू लागल्याने स्वत: प्रिस्टीना येथील हॉस्पिटलमध्ये गेला होता. डॉक्टर म्हणाले की, त्या व्यक्तीने हे सांगितलं नाही की, त्याने फोन का गिळला होता. एका छोट्या कॅमेराने रेकॉर्ड केलेल्या एका क्लिपमध्ये डॉक्टर आणि टीमने त्या व्यक्तीच्या पोटातून फोन शोधताना आणि काढताना दाखवण्यात आलं आहे. व्यक्तीच्या पोटातून फोन काढायला साधारण २ तासांचा वेळ लागला.