वॉशिंग्टन: कोरोना संकटात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा पर्याय दिला. त्यामुळे वर्क फ्रॉम होम परवलीचा शब्द झाला. ऑफिस मीटिंगसाठी झूमचा वापर होऊ लागला. अनेक संस्थादेखील झूमचा वापर करू लागल्या. अमेरिकेत अशीच एक बैठक सुरू असताना एकानं झूमवर मीटिंग सुरू असताना भलताच कारनामा केला आहे. मीटिंग सुरू असताना एका व्यक्तीनं अचानक कपडे काढले आणि तो खोलीत फिरू लागला. त्याचा हा कारनामा कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
बैठक सुरू असताना व्यक्तीनं अचानक कपडे काढल्यानं बैठकीत सहभागी झालेल्या इतरांना धक्काच बसला. यामध्ये महिलांचादेखील समावेश होता. डेली स्टारनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मियामी बीच चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांची झूमवर एक बैठक सुरू होती. कोरोना संकटामुळे बैठकीचं आयोजन झूमवर करण्यात आलं होतं. ही बैठक फेसबुकवर लाईव्ह दाखवली जात होती. बैठक सुरू असताना एका व्यक्तीनं अचानक कपडे काढले. त्यामुळे बैठकीत सहभागी झालेल्या इतरांना धक्काच बसला.
झूमवर मीटिंग सुरू असताना एका व्यक्तीनं अचानक कपडे काढले. त्यानंतर तो खोलीत फिरू लागला. थोड्या वेळानं तो खुर्चीत येऊन बसला आणि मीटिंगमध्ये सहभागी झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मीटिंग सुरू असताना व्यक्तीनं केलेला प्रकार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.