सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:14 AM2022-12-27T10:14:41+5:302022-12-27T10:15:14+5:30

झालं असं की, सासरी गेल्यावर तो एका झाडाला गळफास घेऊन लटकला. सुदैवाने तिथे असलेल्या सासरच्या दोन तरूणींनी त्याला वाचवलं.

Man tried to hang at house of laws then two girl saved his life in Shivpuri MP | सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव!

सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव!

Next

Drunk Man Hanged : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. इथे सासरी गेलेल्या एका तरूणाने असा काही कारनामा केला की, सगळेच हैराण झाले. झालं असं की, सासरी गेल्यावर तो एका झाडाला गळफास घेऊन लटकला. सुदैवाने तिथे असलेल्या सासरच्या दोन तरूणींनी त्याला वाचवलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीलपुरा येथे राहणाऱ्या व्यक्तीने हा कारनामा केला. हे सगळं त्याने नशेच्या स्थितीत केलं. भावाच्या सासरी गेल्यावर तरूण भरपूर दारू प्यायला होता. त्याला समजत नव्हतं की, तो काय करतोय. घराबाहेर असलेल्या झाडाला त्याने दोरी बांधली आणि गळफास घेतला. 

सुदैवाने तिथे असलेल्या दोन तरूणी ज्या त्याच्या भावाच्या मेहुण्या आहेत. त्यांनी त्याचा जीव वाचवला. तरूणींनी त्याला पाहताच धावतच त्याच्याकडे गेल्या. त्याचे पाय पकडून त्याला खांद्यावर घेतलं. ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

सध्या तरूणाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तरूण आता बरा असल्याचं सांगण्यात आलं. घटनेची सूचना मिळताच त्याच्या घरातील लोकही तिथे पोहोचले. असं सांगण्यात आलं की, दारूच्या नशेत त्याने हे सगळं केलं.

Web Title: Man tried to hang at house of laws then two girl saved his life in Shivpuri MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.