UP News : विषारी साप चावल्यानंतर उपचाराअभावी माणसाचा काही मिनिटात मृत्यू होतो. पण, उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती सध्या चर्चेत आला आहे, ज्याला 40 दिवसात 7 वेळा साप चावला आहे. विकास दुबे(वय 24), असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला 7 वेळा साप चावल्यानंतरही काहीच होत नसल्याने लोक चकीत झाले आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, हिमाचल प्रदेशमध्ये एक व्यक्ती होता, ज्याला तब्बल 250 हून अधिक वेळा साप चावला आणि तरीही त्याला काहीच झाले नाही.
कोण होती ती व्यक्ती...ही घटना 2003 सालची आहे. त्यावेळी या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये खूप चर्चा झाली होती. अमर सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, तो हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील शाया गावचा रहिवासी होता. तो नेहमी सापांशी खेळायचा, ज्यामुळे अनेकदा त्याला साप चावला. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांचे वय 92 वर्षे होते. ते नेहमी सांगायचे की, मीठ खात नसल्याने त्यांच्यावर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही. त्यांना तब्बल 272 वेळा साप चावला होता, पण शरीरावर कोणताच परिणाम झाला नाही. याशिवाय अमेरिकेत एक व्यक्ती होऊन गेला, ज्याला 173 वेळा साप चावला होता. त्यालाही काही झाले नाही, परंतु 20 वेळा त्यांची तब्येत मात्र बिघडली होती.
विकासच्या घटनेचा तपास होणारदरम्यान, विकास दूबेला वारंवार साप चावल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सीएमओच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले असून, ते 48 तासांत चौकशी करून अहवाल सादर करतील. विकासला 40 दिवसांत 7 वेळा साप चावला, ज्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.