3 Women Send Cheater Boyfriend to Jail: नातं खोट्या गोष्टींच्या आधारावर टिकत नसतं. असंच काही करत असलेल्या चीनच्या एका व्यक्तीला तीन गर्लफ्रेंड्सने मिळून असा काही धडा शिकवला की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. आता या तिन्ही तरूणी चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण....
सामान्यपणे जेव्हा दोन लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्यात सत्य आणि विश्वासाची अपेक्षा केली जाते. पण बरीच नाती ही खोट्या गोष्टींवरच सुरू होतात. हा व्यक्ती एकावेळी तीन तरूणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा त्याची पोलखोल झाली तेव्हा तरूणींनी त्याला तुरूंगात टाकलं.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, शांघायच्या राहणाऱ्या एका व्यक्ती विरोधात 10 फेब्रुवारीला तीन महिलांनी तक्रार दाखल केली की, एकच व्यक्ती त्यांना फसवत आहे आणि त्याने त्यांच्याकडून पैसेही घेतले आहेत. या व्यक्तीची पोलखोल तेव्हा झाली जेव्हा या तीनपैकी एका तरूणीसोबत तो डिनरला गेला होता आणि जास्त दारू प्यायल्याने घरी येऊन बेशुद्ध झाला होता. तरूणीने जेव्हा त्याचा फोन चेक केला तेव्हा तिला त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचे मेसेज दिसले. जे बघून ती घाबरली आणि त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचा नंबर घेतला.
जेव्हा दोघींचं बोलणं झालं तेव्हा समजलं की, ही व्यक्ती तिच्याही घरी नेहमी येत-जात होता आणि रात्रही तिथेच काढत होता. असंही समजलं की, त्याने दोघींनाही लग्नाचं खोटं आश्वासन दिलं होतं. अशातच आणखी एका तरूणीचा त्यांना मेसेज आला की, ती सुद्धा त्याच व्यक्तीची गर्लफ्रेंड आहे.यानंतर तो शुद्धीवर येताच तरूणीने त्याला पैसे मागितले आणि तिन्ही तरूणींनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यातील एकीला तो 2021 पासून, दुसरीला 2022 पासून आणि तिसरीला ऑक्टोबर 2022 पासून डेट करत होता. तिन्ही तरूणींकडून त्याने 12 लाख रूपये घेतले होते.
तरूण तिन्ही तरूणींना त्याच्या नोकरीबाबत खोटं सांगत होता. तो एका मोबाइल रीटेल आउटलेटमध्ये काम करत होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की, त्याने 2020 पासून नोकरी सोडली आहे. जेव्हा त्याला याबाबत विचारलं तर त्याने यातील एका तरूणीसोबत सीरीअस रिलेशन असल्याचं सांगितलं. त्याला तिच्यासोबतही ब्रेकअप करायचं होतं. सध्या तिन्ही तरूणी चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.