ही कहाणी जॉर्ज पॅरोट नावाच्या एका दरोडेखोराची आहे. त्याला बिग नोज जॉर्ज असंही म्हटलं जात होतं. 19व्या शतकात अमेरिकेच्या वाईल्ड वेस्टमध्ये तो एक खतरनाक दरोडेखोर होता. त्याचं काम रस्त्याने जाणाऱ्या रेल्वेच्या वॅगन आणि कोच लुटण्याचं होतं. खास प्रकारच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पैशांना तो लुटत होता. पण नंतर त्याला मारण्यात आलं आणि त्यांच्या चामड्याने शूज बनवण्यात आले. तर त्याच्या डोक्याच्या भाग अनेक वर्ष एक अॅश ट्रे म्हणून वापरण्यात आला.
बिग नोज जॉर्ज आणि त्याचे लोक एल्क पर्वतांच्या रॅटलस्नेक भागात गेले, जिथे त्यांनी व्योमिंगच्या एका डेप्युटी शेरीफ आणि प्रायवेट डिटेक्टिव्हला हल्ल्यात मारलं. ज्यानंतर जॉर्जवर ठेवण्यात आलेलं बक्षीस दुप्पट करण्यात आलं. गॅंगला पकडून दोन वर्षांने रॉलिन्सला आणण्यात आलं. जिथे कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पण त्याआधी त्याने पळून जाण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.
तुरूंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नाची बातमी शहरात पसरली तेव्हा संतापलेले लोक तुरूंगात घुसले आणि त्यांनी जॉर्ज पॅरोटला बाहेर खेचत टेलीग्राफच्या खांबावर लटकवलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचा कुणी दावेदार नसल्याने डॉ. थॉमस मॅगी आणि जॉन ओस्बोर्न यांनी त्याचा मेंदू रिसर्च करण्यासाठी ताब्यात घेतला. त्यांना जॉर्जचा मेंदू असामान्य वाटला नाही. पण त्याची मांडीची आणि छातीची कातडी काढून त्यापासून शूज तयार केले आणि काही भाग औषधाच्या बॅग बनवण्यासाठी दिले. हे शूज ओस्बोर्नने ठेवून घेतले.
जॉर्जच्या शरीराचे काही भाग एका व्हिस्कीच्या बॅरलमध्ये मिठाच्या पाण्यात ठेवण्यात आले आणि नंतर ते डॉ. मॅगी यांनी ऑफिसच्या पटांगणात दफन केले. ओस्बोर्नने जॉर्जच्या शरीराच्या इतर अवयवांवर प्रयोग कायम ठेवले. डॉ ओस्बोर्न नंतर राजकारणात यशस्वी झाले व ते व्योमिंगचे गव्हर्नर आणि नंतर राष्ट्रपती विल्सनचे उपगृह मंत्री बनले. गव्हर्नर बनल्यावर त्यांनी जॉर्जच्या कातड्यापासून तयार केलेले शूज घातले होते. तेच त्याची कवटी त्यांनी आपली 15 वर्षापासून असलेली असिस्टंट लिलियन हीथला दिली होती.
बिग नोज जॉर्जला जवळपास लोक विसरले होते. पण 1950 मध्ये खोदकाम करताना काही मजुरांना एक व्हिस्कीची बॅरल आढळली. यात हाडे होती आणि सोबतच एक कवटी होती. त्याशिवाय एक जोडी शूजही सापडले. याच्या स्पष्टीकरणासाठी डॉ. लिलियन हीथ यांना बोलवण्यात आलं. ज्या त्यावेळी जिवंत होत्या आणि 80 वय झालं होतं. त्यानंतर डीएनए टेस्टींग करण्यात आली.
आज बिग नोज जॉर्जच्या चामड्यापासून तयार शूज, त्याच्या कवटीचा भाग आणि त्याचे डेथ मास्क, व्योमिंग रॉलिंग केके कार्बन काउंटी म्यूझिअममध्ये नेहमीसाठी ठेवण्यात आले आहेत. पण त्याच्या चामड्यापासून तयार औषधे ठेवण्याची बॅग कधीच सापडली नाही.