शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

आपल्या जुळ्या भावाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगात होता हा तरूण, २० वर्षांनी तुरूंगातून सोडलं निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 4:39 PM

अमेरिकेतील Kevin Dugar सोबत असंच काहीसं झालं. तो गेल्या २० वर्षांपासून अशा गुन्ह्याची शिक्षा भोगत होता जो त्याने केलाच नाही.

अनेक सिनेमांमध्ये जुळ्या भाऊ-बहिणींच्या जोड्या पाहिल्यावर चांगलीच मजा येते. त्यांच्यात होणारं कन्फ्यूजन पाहून हसूही येतं. म्हणजे चुकीच्या काम एकाने केलं तर दुसऱ्याला शिक्षा मिळणं वगैरे.  एका साधाभोळा असतो तर दुसरा बदमाश. जुळ्या भावांमध्ये होणारं हे कन्फ्यूजन सिनेमात भलेही आपल्याला हसवत असेल, पण रिअल लाइफमध्ये हे फारच खतरनाक ठरू शकतं.

अमेरिकेतील Kevin Dugar सोबत असंच काहीसं झालं. तो गेल्या २० वर्षांपासून अशा गुन्ह्याची शिक्षा भोगत होता जो त्याने केलाच नाही. मात्र, आता त्याला सोडण्यात आलं. कारण त्याच्या जुळ्या भावाने आपला गुन्हा कबूल केला आहे.रिपोर्टनुसार, Kevin ला गॅंग रिलेटेड शूटींग प्रकरणात २००५ मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. आरोप होता की, २००३ मध्ये त्याने शिकागो अपटाउन भागात गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर एकजण जखमी झाला होता. या गुन्ह्यासाठी त्याला ५४ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा मिळाली होती.

पण Kevin ने हा गुन्हा केलाच नव्हता. त्याने कोर्टात ओरडून ओरडून सांगितलं, पण त्याचं कुणी काह ऐकलं नाही. Kevin ला सुद्धा हे समजलं नाही की, त्याचं नाव या केसमध्ये कसं आलं. पण २०१३ मध्ये Kevin चा जुळा भाऊ Karl Smith ने त्याला एक चिठ्ठी लिहून आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की, ओपन शूटींग करणारा दुसरा कुणी नाही तर तो स्वत: होता.

Karl ने आपला गुन्हा कबूल केला. पण त्यावेळी कोर्टाने हे मान्य केलं नाही. अशात Kevin ला सोडण्यात आलं नाही. झालं असं की, Karl आधीच एका केसमध्ये तुरूंगात ९९ वर्षाची शिक्षा भोगत आहे. अशात वकिलांचं म्हणणं होतं की, तो गुन्हा त्याच्यावर ओढवून घेतोय, कारण त्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. 

नॉर्थवेस्टर्न प्रिट्जर स्कूल ऑफ लॉ सेंटर ऑन रॉन्गफुल कन्विक्शन्सच्या एका वकिलाने Kevin चं प्रकरण पुन्हा काढलं. यावेळी न्यायाधीश दुसरे होते. आणि त्यांनी Kevin च्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर त्याला सोडून दिलं. कोर्टाने त्याला सोडलं, पण स्टेटकडून अजूनही केस ड्रॉप करण्यात आलेली नाही. अशात जर केस ड्रॉप झाली नाही तर पुन्हा एकदा त्यावर ट्रायल सुरू होऊ शकते. कुक काउंटी राज्याचे अटॉर्नी ऑफिसने यावर अजून प्रतिक्रिया दिली नाही.

निर्दोष असल्यानंतरही Kevin च्या आयुष्यातील २० वर्ष तरूंगात गेले. यादरम्यान जग पूर्णपणे बदललं आहे. तुरूंगात सोडल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. आशा आहे की, आता तो त्याचं बाकीचं आयुष्य आनंदाने जगेल. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके