अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एक अजब घटना घडली आहे. त्याचा आनंद एका क्षणात दु:खात बदलला आहे. रिच जॅलोस्को असं या व्यक्तीचं नाव असून त्याला नुकतीच ३० मिलियन डॉलर म्हणजेच २०८ कोटी रूपयांची लॉटरी लागली. अर्थातच हा आनंद खूप मोठा आहे. पण त्याची चिंतेचं कारण त्याची घटस्फोटीत पत्नी ठरली आहे. जी त्याच्यापासून ८ वर्षांपूर्वी दूर झाली.
२०१३ मध्ये खरेदी केलं होतं तिकीट
झालं असं की, रिचला स्थानिक कोर्टाने आदेश दिला आहे की, त्याने जिंकलेल्या रकमेतील अर्धी रक्कम घटस्फोटीत पत्नीला द्यावी. कारण त्याने हे तिकीट २०१३ मध्ये खरेदी केलं होतं. २०११ पासूनच त्याची पत्नी त्याची पत्नी वेगळी राहत होती. पण त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला नव्हता.
घटस्फोटीत पत्नीला द्यावे लागतील १५ मिलियन डॉलर
कोर्टाच्या आदेशानुसार, आता रिच जेलॅस्कोला आता १५ मिलियन डॉलर रक्कम घटस्फोटीत पत्नीला द्यावी लागेल. ही बातमी जशी सोशल मीडियात आली, लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकजण म्हणाले की, असं करणं चुकीचं आहे. तर काही लोकांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
कोर्टात जज काय म्हणाले?
कोर्टात रिचच्या वकीलांनी सांगितले की, 'रिच भाग्यशाली आहे की, त्याला लॉटरी लागली. पण हे भाग्य त्याचं आहे मेरीचं नाही'. यावर जज जॉन मिल्स म्हणाले की, 'तिकीट तेव्हा खरेदी केलं गेलं जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे ही एक वैवाहिक संपत्ती आहे'.