प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी चांगला नाही. त्यामुळे आता बाजारात तांबे, माती आणि बांबूपासून तयार केलेल्या बॉटल्स मिळतात. पण अजूनही बरेच लोक प्लास्टिकपासून तयार टिफिनचाच वापर करताना दिसतात. अशात आयएफएस सुधा रमन यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच विचारात पडाल. कारण या व्हिडीओत तुम्हाला बांबूपासून तयार केलेला टिफिन बघायला मिळेल. हा टिफिन पर्यावरणाचं नुकसानही करणार नाही आणि याचे आरोग्यालाही फायदे आहेत.
सुधा रमन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात जोगम बेम्बू द्वारे तयार करण्यात आलेला बांबूचं टिफिन कॅरिअर बघा. लोकल रिसोर्सेजचा वापर करून हा सुंदर डबा तयार करण्यात आलाय. नॅच्युरल प्रॉडक्ट्चा वापर करा. हे केवळ आकर्षकच नाही तर इको फ्रेन्डली आणि अनेकांचं पोट भरण्याचं माध्यम आहे.
लोक या खास प्रकारच्या इको फ्रेन्डली टिफिनचं कौतुक करत आहेत. अनेकांचं मत असं आहे की, यांच डिझाइन कमाल आहे. तर काही लोकांना वाटतं की, याचा वापर करून पर्यावरणाला याचा फायदा होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. तुम्हाला काय वाटतं?
बाबो! 'या' मुलीची उंची पाहून द ग्रेट खली सुद्धा होईल अवाक्, पायांची लांबी वाचाल तर चक्रावून जाल!
लय भारी! हत्तीच्या हेअरस्टाईलने सोशल मीडियावर धुमाकुळ; दिवसातून २-३ वेळा केस होतात स्वच्छ