लंडन : असे म्हणतात की, संकटाच्या काळात सख्खेही परके होतात. मात्र, बर्मिंगहम येथील १६ वर्षांच्या मुलीने प्रियकर फार दिवसांचा सोबती नसल्याचे माहीत असूनही त्याच्याशी विवाह करून वचन पाळले. या मुलीच्या मित्राला रक्ताचा कर्करोग होता. डॉक्टरांनी तो फार तर एक आठवडा जगेल, असे सांगितले होते. हे सगळे ठाऊक असूनही १६ वर्षांच्या अॅमी क्रिसवेलने ओमार अल शेखची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याशी विवाह केला. या विवाहाचे सर्व विधी रुग्णालयात झाले. अत्यंत दु:खद बाब म्हणजे विवाहाच्या तिसऱ्या दिवशी ओमारचा मृत्यू झाला. ओमारच्या मृत्यूनंतर अॅमी म्हणाली की, मी माझ्या मित्राची अंतिम इच्छा पूर्ण केली याचा मला आनंद आहे. या विवाहाच्या सर्व मधुर आठवणी जीवनभर माझ्यासोबत राहतील. ओमारच्या निधनाबद्दल अॅमीने दु:ख व्यक्त केले. तो आणखी काही दिवस माझ्यासोबत राहू शकला असता, तर खूप बरे झाले असते, असे ती म्हणाली. या विवाहाला दोन्ही कुटुंबांतील सदस्य उपस्थित होते.
मरणासन्न मित्राशी विवाह
By admin | Published: March 28, 2017 1:38 AM