कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. प्रेमाचे अनेक किस्से हे सतत समोर येत असतात. अशीच एका अजब प्रेमाची गजब गोष्ट आता समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या पतीचं भरभरून कौतुक केलं आहे. कारण त्याने पत्नीच्या प्रेमाला पाठिंबा दिला आहे. विवाहित महिला एका लग्न झालेल्या महिलेच्या प्रेमात पडली आणि यामध्ये पतीने तिला पूर्ण साथ दिली आहे. विशेष म्हणजे ही महिला दोन मुलांची आई आहे.
लिहा हॅमिल्टन असं या महिलेचं नाव आहे. ती बर्लिन येथे राहते. ती ज्या स्त्रीच्या प्रेमात पडली तिलाही मुलं आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, महिलेन सांगितलं की, ती पहिल्यांदा न्यूझीलंड विद्यापीठात तिच्या पतीला भेटली होती. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पतीच्या नोकरीनंतर लिहाला जर्मनीला यावे लागले. याच दरम्यान किंडरगार्डर स्कूलच्या गेटवर एका महिलेच्या प्रेमात पडल्याचे तिने सांगितलं आहे. यावेळी पती काहीच बोलला नाही. उलट तो पूर्ण पाठिंबा देत राहिला.
महिला म्हणते, "मी दुसऱ्या विवाहित महिलेला भेटले. तिच्यासोबत संध्याकाळी फिरायला जायला सुरुवात केली. तिची आणि माझी लवकरच घट्ट मैत्री झाली. आम्ही दोघीही खूप विचित्र, साहसी आणि मजेदार आहोत." लिहाने सांगितले की, ती महिला तिची स्तुती करायची. कधी ती फिटनेसची स्तुती करायची, तर कधी तिच्या डोळ्यांचं सुंदर वर्णन करायची.
लेखिका आणि संपादक म्हणून काम करणारी लिहा म्हणते, माझा पती मला त्या महिलेसोबतच्या नात्याबाबत साथ देईल की नाही याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. केवळ डेटिंगसाठी नाही तर खऱ्या नात्यासाठी. याबाबत नवऱ्याला विचारलं असता त्याचं उत्तर होतं - का नाही? यानंतर, लिहा आणि तिची नवीन मैत्रीण एकत्र हँग आउट करू लागल्या. एकमेकांना डेट करू लागल्या. आपल्या मुलांना आणि पतींनाही पार्टीसाठी आमंत्रित केले. लिहा या महिलेसोबत दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिली.
लिहाने सांगितले की, 'मी आणि माझी मैत्रीण खूप भावनिक आहोत आणि हळूहळू वेगळे झालो आहोत. रिलेशनशिप तुटल्यानंतर ती अनेक महिने रोज रडायची. पण तरीही नवऱ्याने तिला साथ दिली. तो सगळं ऐकून घ्यायचा, मिठीत घ्यायचा आणि घराबरोबरच मुलांना सांभाळायचा. तिच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतेच वृत्त दिले आहे.