महानगर दिल्लीतील खारी बावडी हा छोटासा परिसर अनेकांना ऐकूनही माहीत नाही. कित्येक दिल्लीकर तिथे गेलेलेही नाहीत. पण तो अशिया खंडातील सगळ््यात मोठा मसाल्याचा घाऊक बाजार आहे. खारी बावडी बाजार १७ व्या शतकापासून जुन्या दिल्लीतील फतेहपुरी मशिदीनजीकच्या ऐतिहासिक भागात भरतो. त्याचे उद््घाटन शेर शाह सुरीचा मुलगा सलीम शाह याच्या राजवटीत झाले. खारी बावडी म्हणजे जिचे पाणी खारे आहे, अशी विहीर. आज मात्र तिचा पत्ताच नाही. या बाजाराची स्थापना ज्यांनी केली त्यांची नववी किंवा दहावी पिढी आज दुकाने चालवतात. व्यापारी आणि दुकानदार येथे स्वस्तात देशी आणि विदेशी मसाले, सुका मेवा व इतर जिन्नसा यांची खरेदी करता येईल का ते बघतात. येथे मिरच्या, अशुद्ध गुलाबी मीठ, काळे मीठ, डाळी, तांदूळ, वनस्पती, सुका मेवा आणि वेगवेगळ््या आकारातील व रंगातील धान्ये मिळतात. काही दुकानात खवा आणि गूळही तुम्हाला दिसेल. गेल्या काही वर्षांत मसाल्यांचा हा भलामोठा बाजार पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे. अरुंद गल्ल्यांतील ही दुकाने अतिशय आकर्षक अशा मांडणीची असून त्यात ठेवलेल्या वस्तू आणि जिन्नसा काही ना काही तरी विकत घ्यावे अशा मोहात पाडतात. हजारो पर्यटक येथे भारतीय मसाल्यांच्या खरेदीसाठी येतात. तिथे जाणारे बहुसंख्य लोक मग गली पराठेवालीमध्ये पराठे खातात आणि मग ओल्ड फेमस जलेबीवालाकडील जिलबीवर ताव मारतात.
मसाल्याचा अशियाप्रसिद्ध बाजार दिल्लीत
By admin | Published: January 12, 2017 12:48 AM